Tuesday, January 27, 2026
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य अभिनेत्री रोजा यांनी चक्क साडीमध्येच खेळली कबड्डी, तेही पुरुषांच्या संघात; पाहा व्हिडिओ

दाक्षिणात्य अभिनेत्री रोजा यांनी चक्क साडीमध्येच खेळली कबड्डी, तेही पुरुषांच्या संघात; पाहा व्हिडिओ

दक्षिण भारतीय अभिनेत्री रोजा या केवळ दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील उत्तम अभिनेत्रीच नव्हे, तर एक प्रतिष्ठित राजकारणीही आहेत. त्या दुसऱ्यांदा आंध्रप्रदेश विधानसभा मतदार संघाच्या सदस्या म्हणून सध्या कार्यकाळ सांभाळत आहेत. राजकारणातील अनेक प्रशंसनीय कामांमुळे त्या इतर महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. रोजा त्यांच्या एका व्हिडिओमुळे बर्‍याच दिवसानंतर त्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या कबड्डी खेळताना दिसत आहेत.

आमदाराद्वारे कबड्डी सामन्याचा कार्यक्रम आयोजित
व्हिडिओची खास बाब म्हणजे रोजा महिला संघाऐवजी पुरुष संघात उत्साहाने कबड्डी खेळताना दिसत आहेत. यापेक्षाही विशेष म्हणजे, त्यांनी खेळात आपले कौशल्य दाखवण्यासाठी कोणत्याही स्पोर्ट ऍक्सेसरीजचा वापर केला नाही. साडीमध्येच सामन्य खेळाडूंसमोर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा सामना शहर आमदाराने म्हणजे रोजा यांच्याद्वारेच आयोजित करण्यात आला होता. ज्यात त्यांनी मैदानावर त्यांच्या कौशल्याचा जलवा दाखवला.

व्हिडिओमध्ये रोजा ज्या उत्साहात मैदानात उतरल्या आणि खेळ सुरू केला, हे पाहून तेथील लोकही दंग झाले. आपण या व्हिडिओमध्ये त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहू शकतो. प्रत्येकजण त्यांच्या खेळाचे कौतुक करत आहे.

दोनवेळा नगर विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत रोजा
रोजा या आंध्रप्रदेशच्या ‘युवजना श्रमिका राइठू काँग्रेस’ पक्षाशी संबंधित आहेत आणि सध्या राज्य महिला अध्यक्षा म्हणून काम करत आहेत. त्या राज्यातील नागरी विधानसभा मतदार संघातून दोन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकल्या आहेत. 2014 साली त्यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि दुसरी 2019 मध्ये जिंकली. यानंतर त्यांना एपीआयआयसीचे (APIIC)अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. व्यावसायिक जीवनाबरोबरच रोजा त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घेत असतात. अभिनेत्रीचे पती आर.के. सेल्वमनी हे दक्षिण भारतीय सिनेमाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

रोजा यांनी लग्नाआधी आरके सेल्वमनीच्या ‘अथिरदी पदई’, ‘राजा मुथिराई’, ‘राजली’, ‘आदिमाई चांगिली’, ‘अरसियाल’, ‘पोट्टू अम्मन’ आणि ‘कुटत्रा पथिरिकई’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. अशाप्रकारे बरेच दिवस एकत्र काम करून हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर 2002 मध्ये या जोडप्याने लग्न केले. अभिनेत्री अखेर 2015 साली ‘एन वाझी थानी वझी’ चित्रपटात दिसल्या होत्या आणि त्यानंतर त्या राजकारणात आपले योगदान देत आहेत. याव्यतिरिक्त त्या दोन मुलांच्या आई आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा