बॉलिवूडमध्ये काम करणे ही जवळपास अनेकांचे स्वप्न असते. कारण इथे कलाकारांना बक्कळ पैसा मिळत असतो. विशेष म्हणजे मुख्य भूमिकेतील अभिनेता, अभिनेत्री, खलनायक यांना सर्वाधिक पैसे मिळतात. त्यामुळे इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांची आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या एका चित्रपटाच्या फी बाबतची चर्चा केली जाते. बॉलिवूडप्रमाणेच इतर चित्रपटसृष्टीतही कलाकारांना भरपूर पैसा मिळतो. त्यातीलच एक म्हणजे दाक्षिणात्य (टॉलिवूड) चित्रपटसृष्टी होय. आज या लेखात आपण टॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती रुपये आकारतात, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया….
१. अनुष्का शेट्टी
टॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अनुष्का शेट्टीला ओळखले जाते. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला अनुष्का एका चित्रपटासाठी २ ते २.५ कोटी रुपये आकारत असायची. परंतु ‘बाहुबली’ या बिग बजेट सिनेमाच्या यशानंतर तिने आपली फी वाढवली आहे. आता ती एका चित्रपटासाठी तब्बल ५ कोटी रुपये आकारते.
२. प्रियामणी
टॉलिवूडची ऐश्वर्या म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियामणीने तमिळ, तेलुगु, कन्नड व्यतिरिक्त हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती एका चित्रपटासाठी २.५ ते ३ कोटी रुपये घेते. ही रक्कम बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या तुलनेत खूप जास्त आहे.
३. काजल अगरवाल
अभिनेत्री काजल अगरवाल ही बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात झळकली आहे. यामधून ती चांगली कमाई करते. याव्यतिरिक्त टॉलिवूड सिनेमातूनही ती जबरदस्त कमावते. तिने अजय देवगणसोबत ‘सिंघम’ आणि अक्षय कुमारसोबत ‘स्पेशल २६’ या चित्रपटात काम केले आहे. ती एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेते.
४. श्रिया सरन
टॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रिया सरन एका चित्रपटासाठी कमीत कमी २ कोटी रुपये घेते. तिने ‘मिस इंडिया’ किताबावरही आपले नाव कोरले आहे.
५. समंथा अक्किनेनी
सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा चैतन्य याची पत्नी समंथा अक्किनेनी ही टॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी कमीत कमी १.५ कोटी रुपये घेते.
६. कीर्ति सुरेश
चाहत्यांना आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने घायाळ करणारी अभिनेत्री कीर्ति सुरेशने खूप कमी कालावधीत टॉलिवूडमध्ये आपली ओळक निर्माण केली आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास २ कोटी रुपये घेते.
७. रकुल प्रीत सिंग
टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री रकुल प्रीत एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेते.
८. तृषा कृष्णन
टॉलिवूड अभिनेत्री तृषा कृष्णन सन २०१० मध्ये बॉलिवूडच्या ‘खट्टा मीठा’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत सुपरस्टार अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत होता.
तृषा एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-