Friday, December 8, 2023

साऊथचे ‘अंबानी’ म्हणून ओळखले जातात मामूट्टी, वकिली सोडून धरली होती अभिनयाची कास

दाक्षिणात्य मेगासुपरस्टार मामूट्टी यांचा जन्म 7 डिंसेबर 1948 त्रावणकोर केचीनच्या कोट्टायम जिल्ह्यात झाला. मामूट्टीचे पूर्ण नाव मुहम्मदकुट्टी इस्माइल आहे. चित्रपट विश्वात पदार्पण करण्याआधी त्यांनी 2 वर्ष वकिली सुद्धा केली आहे. ममूटीने एका ठिकाणी जिथे मूख्यत्वे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि सातासमुद्रापलीकडे म्हणजेच इंग्रजी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आज ममूटी 71वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी.

जिथे तो खुद्द साऊथच्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. त्याचवेळी त्यांचा मुलगा दुलकर सलमानही सिनेविश्वात आपला ठसा उमटवत आहे. मामूट्टी (Mammootty) 50 वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करत असतील, पण त्याआधी ते कायद्याचा अभ्यास करायचे. अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्यापूर्वी त्यांनी सुमारे दोन वर्षे कायद्याचा सराव केला. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. या अभिनेत्याने 1971 मध्ये मल्याळम चित्रपट अनुभवंगल पलीचकलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ममूटीचे योगदान चित्रपट जगात 5 दशके इतका आहे. आतापर्यंत त्यांनी 400 चित्रपटांत काम केले आहे. असं सांगितलं जाते की 1986 मध्ये एकाच वर्षात ममूटीने 35 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ममूटीच्या हिट चित्रपटांमध्ये ‘थीरम तेंदुन्ना थीरा’ (1983), ‘रुग्मा’ (1983), असे अनेक चित्रपट आहेत.

मामूटी हे आज सिनेविश्वातील एक मोठे नाव आहे. त्याची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही. तो मल्याळमचा दिग्गज अभिनेता आहे. आज जरी तो आपल्या चित्रपटांच्या आणि अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वावर राज्य करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्यापूर्वी तो वकिली करत असे? चित्रपटात येण्यापूर्वी तो कायद्याचा अभ्यास करत असे. त्याने दोन वर्षे कायद्याचा सराव केल्याचे सांगितले जाते. अभिनेत्याने एर्नाकुलम लॉ कॉलेजमधून एलएलबी केले. ते एक यशस्वी वकील आहेत. हव्यासापोटी त्यांनी वकिली सोडली होती. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १९७९ मध्ये सल्फतशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

आपण नेहमीच पाहतो की चित्रपट तारकांचे वेगवेगळे शौक असतात जसे की काही सेलेब्सकडे शू कलेक्शन आहे तर काही सेलेब्स ना परफ्यूम्सचा शौक असतो. पण ममूटीला गाड्यांचा शौक आहे. ममूटीजवळ 369 गाड्या आहेत. ममूटीच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा पासून मर्सडीज ते जॅग्युआर या गाड्यांचा देखील समावेश आहे. ममूटीला साउथमध्ये ऑडी खरेदी करणारा पहिला स्टार म्हणून देखील ओळखले जाते. (South megasuperstar Mammootty birthday)

अधिक वाचा-
चित्रपट मिळवण्यासाठी राधिकाला फोनवर माराव्या लागल्या अश्लील गप्पा, तरीही मिळाले नव्हते काम; स्वत: केला खुलासा
वडिलांच्या श्रीमंतीला लाथ मारून जेनिफर केंडलने केलेला शशी कपूर यांच्याशी पळून जाऊन विवाह

हे देखील वाचा