Friday, April 25, 2025
Home साऊथ सिनेमा एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

एकच नंबर! आता जावई- सासरे होणार एकमेकांचे सख्खे शेजारी; नवीन घरासाठी धनुष करणार ‘इतके’ कोटी खर्च

आपल्या अभिनयाने केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे, तर जगभरात आपला ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे सुपरस्टार धनुष होय. त्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या चाहतावर्ग कोटींमध्ये आहे. सोशल मीडियावरही आपल्याला याचा प्रत्यय वारंवार येतो. चित्रपटांव्यतिरिक्त धनुष आपल्या लाईफस्टाईलसाठीही ओळखला जातो. थलायवा रजनीकांत यांचा जावई असलेला धनुष राजा आलिशान आयुष्य जगतो. अशातच आता वृत्त आले आहे की, धनुष चेन्नईत नवीन घर बनवत आहे. सोबतच अशीही माहिती समोर आली आहे की, चेन्नईच्या पोएस गार्डनमधील घरासाठी तो चांगलीच रक्कम मोजणार आहे. (South Superstar Dhanush To Spend 150 Crore Rupees For His New Home In Chennai)

धनुषचे हे आलिशान घर चार मजली असणार आहे. विशेष म्हणजे याच भागात त्याचे सासरे आणि सुपरस्टार रजनीकांतही राहतात. मागील काही दिवसांपूर्वीच धनुषने या जागेचे भूमीपूजन केले होते. यावेळी रजनीकांतदेखील उपस्थित होते.

माध्यमातील वृत्तानुसार, धनुषचे हे घर १९००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. हे घर बनवण्यासाठी जवळपास १५० कोटी रुपये लागतील. धनुष सध्या अमेरिकेत असून तो तिथे एका वेबसीरिजची शूटिंग करत आहे. या वेबसीरिजचे नाव ‘द ग्रे मॅन’ असे आहे.

‘द ग्रे मॅन’बद्दल बोलताना धनुषने म्हटले होते की, “मला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे की, मी ‘द ग्रे मॅन’मध्ये काम करत आहे. यामध्ये माझ्याव्यतिरिक्त रायन कोसलिंग आणि ख्रिस इव्हान्स यांच्या मुख्य भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन द रूसो ब्रदर्स करणार आहेत. मी या शानदार प्रोजेक्टचा भाग आहे आणि मला खूप चांगले वाटत आहे. माझ्या चाहत्यांचे आभार, जे संपूर्ण जगभरात पसरले आहेत आणि माझ्यावर प्रेम करत आहेत.”

याव्यतिरिक्त धनुष आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत १८ नोव्हेंबर, २००४ रोजी लग्न केले होते. लग्न तमिळ रीतीरिवाजानुसार झाले होते. यामध्ये जबरदस्त सुरक्षेची व्यवस्था केली होती. इतकेच नव्हे, तर रिसेप्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांकडून कार्ड दाखवून आतमध्ये येण्याची विनंती करण्यात आली होती.

धनुषने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘मारी’, ‘शमिताभ’, ‘रांझना’, ‘मेरी ताकत मेरा फैसला’ यांसारख्या अनेक हिंदी आणि तमिळ चित्रपटांचा समावेश आहे.

हे देखील वाचा