Saturday, July 27, 2024

बिग ब्रेकिंग! अभिनेता महेशबाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आधाराचा हात कायमचा हरवला

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याच्याबद्दल अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता महेशबाबू याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेशबाबू याचे पिता आणि टॉलिवुडच्या जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व घट्टामनेनी शिव राम कृष्ण मूर्ति यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सोमवारीच (14 नोव्हेंबर) त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा (मंगळवार, 15 नोव्हेंबर) मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवर अनेकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ( Telugu Superstar Mahesh Babu Father Veteran Tollywood Actor Krishna Ghattamaneni Passed Away )

प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचे वडिल साऊथ इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता कृष्णा (Krishna) यांची अचानकच तब्येत बिघडली त्यांमुळे त्यांना त्वरित हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यासारखे जानवले. शेजारी सगळेच व्यक्ती घाबरले आणि त्यांना एक सेकंदाचाही विलंब न घेता लगेचरुग्णालयात दाखले केलं होतं.

कृष्णा यांना रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर लगेच त्यांचा इलाज सुरु केला होता, मात्र त्यांच्या शरिराने त्यांना साथ दिली नाही. त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच महेश बाबू याची आई इंदिरा देवी (Indiara Devi) यांचे निंधन झाले होते. यानंतर महेश बाबू खूपच दु:खी झाले होते आणि आता त्यांचे वडील कृष्णा यांनीदेखिल त्याचा साथ सोडला आहे त्यामुळे अभिनेता पूर्णपणे तुटून गेला आहे.

महेश सतत आपल्या सोशल मीडियावर वडीलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी आई गेल्यामुळे महेश आपल्या वडीलांच्या खूप जवळचा होता. मात्र, त्यांनीही आता त्याला पोरकं केलं आहे. कृष्णा हे तेलंगणा इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेत्यासोबतच एक राजकारणी देखिल होते. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर कृष्णा घट्टामनेनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली आहे. चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कृष्णा हे प्रसिद्ध कालाकारासोतच दिग्दर्श आणि निर्माता देखिल होते त्यांनी एकूण पाच दशकामध्ये काम केले आहे. त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार कामगिरीला भारत सरकारने 2009 सलाी पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! अभिनेता महेशबाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आधाराचा हात कायमचा हरवला
सनीच्या बाेल्डनेसवर चाहते झाले फिदा, फाेटाे गॅलरी फक्त तुमच्यासाठी

हे देखील वाचा