Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूड आणि हिंदी भाषेच्या वादात आत्तापर्यंत ‘या’ कलाकारांमध्ये रंगलाय कलगीतुरा

सध्या चित्रपट जगतात एकापाठोपाठ एक येणाऱ्या धमाकेदार दाक्षिणाात्य चित्रपटांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा'(pushpa), ‘आरआरआर’ (RRR), ‘केजीएफ’ (KGF) अशा सुपरहीट चित्रपटांमुळे जगभरात दाक्षिणात्य सिनेमांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. सोबतच सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या अभिनेत्यांमध्ये हिंदी भाषेवरुन चांगलाच वाद रंगल्याचेही पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेता महेश बाबूने (Mahesh babu) बॉलिवूडवर टिका करताना ते माझी फी देऊ शकत नाहीत असे म्हणले आहे. ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण केला आहे.  आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी यावर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. जाणून घेऊया ते कलाकार आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे.

किच्चा सुदीपअजय देवगण : या संपूर्ण भाषावादाची सुरूवात किच्चा सुदीपच्या एका वक्तव्याने झाली होती. ज्यामध्ये त्याने आता हिंदी ही आपली राजभाषा नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने (ajay devgan) उत्तर देताना हिंदी राजभाषा नसेल तर तुमचे चित्रपट हिंदीमध्ये कशाला प्रदर्शित करता असा सवाल त्याला केला होता. यावर अभिनेता किच्चा सुदीपने (kuccha sudip) माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला असे म्हणत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

सोनु सूद या विषयावर बोलताना अभिनेता सोनु सूदने (sonu sood) आपल्या देशाची मनोरंजन हिच एक भाषा आहे. तुम्हीही कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी तुम्ही लोकांचे मनोरंजन करत असाल तर तुमचा आदर आणखीणच वाढेल. त्याचबरोबर दाक्षिणात्य सिनेमे चित्रपट कसे तयार करावेत याचे उदाहरण आहेत  असे मत व्यक्त केले होते.

अनूप जलोटा एका मुलाखतीत बोलताना अनूप जलोटा (anuj jalota) यांनी महात्मा गांधी हिंदीमध्ये बोलायचे. आपल्या देशात सर्वात जास्त हिंदी भाषाच पटकन लक्षात येते त्यामुळे या वादावर लोकांनी जास्त चर्चा करण्यात वेळ घालवू नये. दक्षिण भारतीय भाषांसोबत पंजाबी आणि बिहारी भाषेलाही सन्मान मिळतो, असे मत व्यक्त केले आहे.

मनोज वाजपेयी प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीने (manoj bajpeyee) याबद्दल बोलताना थेट बॉलिवूडवरच हल्ला चढवत हे सिनेमे म्हणजेच बॉलिवूडच्या निर्मात्यांना शिकवलेला मोठा धडा आहे. त्यांची मेहनत आणि शॉट घेण्याची कला पाहण्यासारखी आहे. ते इतकी मेहनत प्रत्येक शॉटसाठी घेतात की जणू हा शेवटचाच शॉट आहे.

सोनु निगम – प्रत्येक विषयावर आपले मत मांडणारा अभिनेता सोनु निगमने (sonu nigam) या वादावर प्रतिक्रिया देताना भाषेच्या मुद्द्यावरुन देशात फूट पाडू नका असे स्पष्ट मत व्यक्त दिले आहे. आपल्या संविधानात कुठेही हिंदी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिलेला नाही, असे म्हणत देशामध्ये चर्चा करण्यासाठी इतरही अनेक मुद्दे आहेत असे म्हणले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा