दक्षिण कोरियाची अभिनेत्री करणार सुपरस्टार राम चरणसोबत रोमान्स? नॅशनल क्रशही दिसणार चित्रपटात

South Superstar Ram Charan Will Romance Bae Suzy In S Shankar Movie Bhojpuri South Mogi


दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ आपल्याला हिंदी म्हणजेच बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये दाक्षिणात्य चित्रपट पडद्यावर मोठ्या संख्येने रिलीझ होणार आहेत. हे चित्रपट हिंदीसोबतच अनेक भाषांमध्ये रिलीझ करण्याची तयारीही सुरू झाली आहे. अशातच नुकतेच आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जाणारा दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. तो लवकरच चित्रपट निर्माता एस शंकर यांच्या ऍक्शन-ड्रामा चित्रपटात झळकताना दिसणार आहे. या चित्रपटाबाबत तो भलताच उत्सुक झाला आहे.

राम चरणने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा केली की, तो चित्रपट निर्माता एस शंकर यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “शंकर सरांसोबत शानदार सिनेजगताचा भाग बनण्यासाठी मी खूप उत्साही आहे.”

राम चरण आणि शंकर यांच्यासोबत काम करण्याबाबत दिल राजूनेही प्रतिक्रिया देत लिहिले होते की, “मी खूप खुश आहे आणि भारताचा सर्वोत्तम अभिनेता राम चरण आणि दिग्दर्शक शंकर यांच्याशी सहयोग करणार आहे आम्ही हा सिनेमा क्रिएटिव्ह सिनेमाच्या दृष्टीने पॅन इंडिया दर्शकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरवले नाही. परंतु या चित्रपटात ऍक्शन भरपूर असेल.

आतापर्यंत या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर येत आहे. ही बातमी वाचून चाहत्यांची क्रेझ राम चरणच्या चित्रपटासाठी दुप्पट होणार आहे.

खरं तर राम चरण अभिनित दिग्दर्शक एस शंकर यांच्या चित्रपटात दक्षिण कोरियाच्या अभिनेत्रीला घेण्याबाबत माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, निर्माते शंकर यांच्या चित्रपटात दक्षिण कोरियाची अभिनेत्री बे सुझीला घेणार आहेत. सोशल मीडियावर असे वृत्त आहेत की, शंकर यांच्या चित्रपटात कोरियन अभिनेत्री राम चरणसोबत दिसू शकते. तरीही, सुझीबाबत राम चरणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच निर्मात्यांनीही याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.

एस शंकर यांच्या आगामी चित्रपटाबाबत अशीही माहिती समोर येत आहे की, ते बे सुझीशी संपर्क साधत आहेत. तेव्हापासूनच सोशल मीडियावर अभिनेत्रीचे राम चरणसोबतचे फोटो मीम्स बनत आहेत. दुसरीकडे अशीही बातमी आहे की, राम चरणच्या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदाना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल.

नायक फेम अभिनेता लवकरच शंकर यांच्या ऍक्शन ड्रामा  चित्रपटाची शूटिंग सुरू करतील. या चित्रपटाला राजू गुरू आणि शिरीष गुरू हे प्रोड्युस करत आहेत. हा चित्रपट राम चरणचा १५ वा आणि दिल राजूचा ५० वा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत रिलीझ होईल. असेही म्हटले जात आहे की, राम चरणला यापूर्वी अशा अंदाजात कधीही पाहिले नसेल.

राम चरणने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘येवडू’, ‘मगधिरा’, ‘ब्रूस ली’, ‘नायक’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाथटबमध्ये श्रीदेवीला ‘त्या’ अवस्थेत पाहून सुन्न झाले होते बोनी कपूर! वाचा नेमकं काय घडलं होतं त्या काळरात्री…

-भाऊ सोपं नाही ‘पंकज त्रिपाठी’ होणं, कधीकाळी स्टूडियोतून धक्के मारून हाकललं होतं.! वाचा कलावंताची संघर्षगाथा

-चिरलेल्या गळ्यासह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह; अमिताभ यांच्यासोबतच्या भुमिका विशेष गाजल्या


Leave A Reply

Your email address will not be published.