Friday, July 5, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापति विजयला ‘या’ कारणासाठी मागावी लागली लोकांची माफी, व्हिडिओ झाला व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापति विजयचे (Thalapathy Vijay) सिनेमे म्हणजे बॉक्स ऑफिसवर धमाका होणार यात शंका नाही. विजयचे सिनेमे तुफान कमाई करतात आणि ब्लॉकबस्टर ठरतात. त्याला तुफान फॅन फॉलोविंग देखील आहे. त्याला भेटण्यासाठी त्याची झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स सतत झुरताना दिसतात. त्यासाठी अनेकदा भांडणं वाद देखील होतात. नुकताच याचा प्रत्यय चेन्नईमध्ये आला. चेन्नईमध्ये नुकत्याच स्थानिक निवडणुका पार पडल्या. तिथे थलापति विजय त्याचे मत टाकण्यासाठी गेला होता. त्याला पाहून तिथे असलेली गर्दी बेकाबु झाली आणि मोठा गोंधळ उडाला. यासाठी विजयने सर्वांची माफी देखील मागितली. 

शनिवारी (१९ फेब्रुवारी) रोजी तामिळनाडू येथे स्थानिक निवडणुका झाल्या. यावेळी विजय त्याचे मत नोंदवण्यासाठी गेला होता. जसे लोकांना समजले की, विजय आला आहे, तशी तिथे त्याला बघण्यस्तही गर्दी जमा झाली. लोकं त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी खूपच गर्दी करत होते. त्याच्या गाडीमागे देखील लोकांची गर्दी धावत होती. यासर्व गोंधळामुळे त्या मतदान केंद्रावर आलेल्या इतर लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. यासर्व गोष्टीनंतर विजयने मतदान अधिकारी आणि लोकांची त्यांना झालेल्या असुविधेबद्दल माफी मागत फॅन्सला थोडं असंयम ठेवण्यासाची विनंती केली.

थलापति विजय दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. त्याने त्याच्या दमदार अभिनयाने आणि ऍक्शनने सर्वांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याने मास्टर, सरकार, थेरी, मरसाल, थुप्पक्की, बीगील, वेलायुधाम, पुली, थिरूमलै आदी चित्रपटांमधून तुफान लोकप्रियता मिळवली आहे. लवकरच तो बीस्ट’,थलपति 66 या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भेटीला येणार आहे. एका माहितीनुसार त्याने ‘थलापति 66’ या सिनेमासाठी तब्बल १०० कोटी फी घेतल्याची माहिती आहे. त्याने फी घेण्याच्या बाबतीत रजनीकांत यांना देखील मागे टाकले आहे. विजयने वयाच्या १८ व्या वर्षीच ‘नालैय्या थीरपू’ सिनेमातून पदार्पण केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा