लागोपाठ सुपरहिट चित्रपट देणाऱ्या मेघना गुलजार यांनी वडिलांचा वारसा सांभाळत मिळवले अमाप यश

बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक छबी उमटवणाऱ्या मेघना गुलजार यांचा आज (१३ डिसेंबर) वाढदिवस आहे. उत्कृष्ट दिग्दर्शिका आणि लेखिका म्हणून त्यांनी त्यांची वेगळी ओळख निर्माण केली. गीतकार, लेखक गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची मुलगी याव्यतिरिक्त स्वत:ची एक स्वतंत्र ओळख मेघना यांनी त्यांच्या चित्रपटांमधून इंडस्ट्रीमध्ये निर्माण केली. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १९७३ रोजी झाला.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि आलिया भट्ट, विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘राजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे काम मेघना यांनी केले. चित्रपटाच्या स्क्रिप्ट लिहिण्यापासून मेघना यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. परंतु दिग्दर्शन ही त्यांची आवड नव्हती असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. सुरूवातीच्या काळात मेघना या एका नॅशनल न्यूजपेपर आणि एनएफडीसी पब्लिकेशन चित्रपटासाठी काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हू तू तू’ या चित्रपटाच्या स्क्रिन राइटिंगपासून आपल्या लिखाणाची सुरूवात केली.

View this post on Instagram

A post shared by Meghna Gulzar (@meghnagulzar)

‘फिलहाल’ हा मेघना यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात आई न बनू शकणाऱ्या एका महिलेची व्यथा मांडली होती. त्या महिलेची मैत्रीण सरोगेट आई बनण्याची तयारी दाखवत कशा प्रकारे तिची मदत करते हे या चित्रपटात दाखवले होते. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जस्ट मॅरिड या चित्रपटाचे दिग्दर्शनही मेघना गुलजार यांनी केले होते. २०२० मध्ये प्रदर्शित झालेला मेघना यांंनी दिग्दर्शित केलेला ‘छपाक’ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर गाजला. लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित छपाकला प्रेक्षकांनी पसंती दिली.

View this post on Instagram

A post shared by Meghna Gulzar (@meghnagulzar)

‘राजी’ चित्रपटामुळे मेघना सध्या चर्चेत आहेत. १९७१ चा काळ पडद्यावर साकारणं ही काही सोपी गोष्ट नसल्याचं त्यांना एका मुलाखतीत सांगितलं. १९७१ च्या भारत पाकिस्तानच्या युद्धावर आधारित राजी हा चित्रपट होता. हा सिनेमा देखील तुफान गाजला. सध्या एका नवीन चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचं मेघना यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा-

Latest Post