Friday, March 29, 2024

बॉलिवूडचा ‘अनाडी’ कसा बनला दक्षिणात्य सुपरस्टार? संघर्षाने मिळवले अभिनेते व्यंकटेश यांनी यश

भारतात चित्रपटसृष्टीची लोकप्रियता इतकी आहे की, अनेक ठिकाणी चित्रपट कलाकारांची देवासारखी पूजा केली जाते. दक्षिणेत हा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे चाहते त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांची पूजा करतात. त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असतात. दक्षिणात्य चित्रपटात असे अनेक कलाकार होते जे आपला दमदार अभिनय घेऊन आले आणि सुपरस्टार झाले. असाच एक सुपरस्टार तेलगू फिल्म इंडस्ट्रीत आहे. रविवारी (१३ डिसेंबर) तेलगू सुपरस्टार व्यंकटेश डग्गुबती त्यांचा ६१वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

व्यंकटेश यांचा जन्म १३ डिसेंबर १९६० रोजी मद्रास (चेन्नई) येथील एका तेलुगू कुटुंबात झाला. व्यंकटेश यांचे वडील रामनायडू हे चित्रपट निर्माते आणि खासदार होते. त्यांचा मोठा भाऊ सुरेश बाबू सुरेश प्रॉडक्शन नावाचे मोठे प्रोडक्शन हाऊस चालवतो. व्यंकटेश यांनी शालेय शिक्षण चेन्नईच्या डॉन बॉस्कोमधून आणि कॉलेजचे शिक्षण लोयोला कॉलेजमधून केले. येथून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर ते एमबीए करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि परत आल्यावर ते चित्रपट निर्मितीमध्ये गुंतले आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

करिअरची केली शानदार सुरुवात

व्यंकटेश यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘प्रेम नगर’ या चित्रपटात ते दिसले होते. १९८६ मध्ये आलेल्या ‘कलियुगा पांडावुलु’मध्ये ते खुशबू सुंदरच्या विरुद्ध मुख्य अभिनेता म्हणून दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यांनी १९८८ मध्ये ‘स्वर्णकमलम’मध्ये काम करून आपला ठसा उमटवला आणि या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कारही मिळाला होता. यानंतर ते ‘प्रेमा’मध्ये रोमँटिक व्यक्तिरेखा साकारताना दिसले.

बॉलिवूड चित्रपटांमध्येही आजमावले आपले नशीब

त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आणि ते तेलगूचे सुपरस्टार बनले. ‘प्रेमा’, ‘धर्मचक्र’, ‘गणेश’, ‘राजा’, ‘मुद्ददुल प्रियदू’, ‘चांटी’, ‘बोबब्ली राजा’, ‘संक्रांती’, ‘मसाला’, ‘दृश्यम’, ‘गोपाला गोपाला’ आदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपला ठसा उमटवला. या वर्षी त्यांनी साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘असुरन’ ‘नरप्पा’च्या तेलगू रिमेकमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. व्यंकटेश यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनाडी’मध्ये त्यांनी काम केले होते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत करिश्मा कपूर होती. यानंतर ते १९९५ मध्ये ‘तकदीर वाला’मध्ये दिसले. मग ते दक्षिणेकडे निघाले.

हेही वाचा :

भूतलावर जणू अप्सरा अवतरली! सई ताम्हणकरचे फोटो पाहून तुमच्याही तोंडातून निघतील हेच उद्गार

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

वाढदिवशी कोणतेही कॅप्शन न देता शाहनाझने केला सिद्धार्थचा फोटो शेअर, सिडनाझ पुन्हा चर्चेत

 

हे देखील वाचा