Friday, April 19, 2024

….म्हणून अवघ्या १३-१४ वर्षांच्या मुलांकडून मिळतायेत बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीचा चकित करणारा खुलासा

टेलिव्हिजन शो ‘पांड्या स्टोअर’मध्ये ऋषिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिमरन बुधरूप (Simran Budharup) या दिवसांत चर्चेचा भाग बनली आहे. कारण सिमरन सध्या सोशल मीडियामुळे खूप अस्वस्थ आहे. खरं तर तिला ऑनलाइन बलात्काराच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर आता तिने एफआयआर दाखल केला आहे. सिमरनने तिला तिच्या ऑनस्क्रीन व्यक्तिरेखेसाठी ट्रोल करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सिमरनने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.

मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सिमरन म्हणाली की, “सुरुवातीला मी सर्व निगेटिव्ह कमेंट्स हलकेच घ्यायचे. कारण माझे पात्र अशा प्रकारच्या गोष्टी करत होते, ज्याला नापसंत केले जायचे. ऋषिताने रावी आणि देव यांच्यातील संबंध तोडले होते. पण जेव्हा लोकांनी सोशल मीडियावर मला शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली, तेव्हा गोष्टी बिघडल्या. अनेक गोष्टी घडू लागल्या.” (pandya store actor simran budharup receives rape threats online file fir)

दाखल केला एफआयआर
सिमरन पुढे म्हणाली की, “त्यानंतर मी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर दाखल केला. हा १३-१४ वर्षांच्या मुलांचा गट आहे. त्यांचे पालक त्यांना अभ्यासासाठी फोन देतात, पण ही मुले त्यांच्या पालकांच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेतात. कुठे थांबायचं आणि काय चुकतंय हेच कळत नाही, म्हणून ते या गोष्टी करायला लागतात.”

सिमरनने यापूर्वीही इन्स्टाग्रामवर असे मेसेज शेअर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये धमकीचे मेसेज होते. सिमरन म्हणाली होती की, “मी या सर्व मुलांना फोन करणार आहे जेणेकरुन त्यांच्या पालकांना याची माहिती मिळेल. सोशल मीडियाच्या नावाखाली ही मुले काय करतात हे त्यांच्या पालकांना कळायला हवे.”

दरम्यान ‘पांड्या स्टोअर’ही मालिका चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच यातील कलाकारांनाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा