Wednesday, July 2, 2025
Home मराठी स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. याठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. मात्र आता अभिनेत्री तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

स्पृहा जोशीने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. वास्तविक हा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती एका गाण्यावर अभिनय करत आहे. यातील तिच्या अदा पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडत आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे लाजने पाहून, तर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असेल, असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

हा व्हिडिओ शेअर करत स्पृहाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “सकाळ असावी तर अशी.” आता तिचा हा व्हिडिओ चाहत्यांकडून बराच पसंत केला जात आहे. चाहते व्हिडिओखाली कमेंट्स करून कौतुकाचे पूल बांधत आहेत. शिवाय चाहते भरभरून लाईक्सही देत आहेत.

अभिनयासोबत स्पृहाला कविता लिहण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेतही येत असते. स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पृहा होस्ट म्हणून कार्यरत आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर? खरं काय ते घ्या जाणून

-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन

-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन!’

हे देखील वाचा