Wednesday, June 26, 2024

श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा

श्रीदेवी हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले. 2018साली फेब्रुवारीमध्ये त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. येत्या 24 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांना जाऊन 4 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची पुण्यतिथी जवळ येत असून, या दिवसाच्या निमित्ताने त्यांना आठवून त्यांचा सुपरहिट सिनेमा ‘इंग्लिश विंग्लिश‘ पुन्हा एकदा 24 फेब्रुवारीला चीनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

श्रीदेवी यांनी लोकांच्या मनात एक वेगळे आणि अढळ स्थान निर्माण केले. त्यांचा अभिनय, व्यक्तिमत्व, डान्स आदी सर्वच गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमाने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या सिनेमाने श्रीदेवी यांच्या करियरला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. गौरी शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्ये 2012 साली करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा 11 वर्षांनी हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार इरोज इंटरनॅशनकडून या प्रदर्शनाबाबत सांगण्यात आले आहे की, “भारतीय चित्रपटांनी हळूहळू प्रतिस्पर्धी असणाऱ्या चीनमध्ये आपले प्रेक्षक तयार केले आहेत. चीन फिल्म इंडस्ट्री जगातील दुसरी सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. आम्ही चीनमध्ये भारतीय सिनेमांची मोठी मागणी पाहिली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची ‘इंग्लिश विंग्लिश’ ही फिल्म अतिशय उत्तम आणि त्यांच्या करियरमधली सर्वात मोठी हिट मूवी आहे. हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत.”

गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात त्यांच्या आईच्या आयुष्यातील खरा अनुभव दाखवण्यात आला आहे. या सिनेमात श्रीदेवी या सामान्य गृहिणीच्या भूमिकेत असून, अमेरिकेमध्ये बहिणीच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने जातात आणि मोठे मुले असूनही इंग्लिश शिकतात आणि नवीन मित्रमैत्रिणी बनवतात. हा सिनेमा 2012 वर्षातील सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागातील सिनेमा ठरला. यात श्रीदेवी यांनी शांत, मधुर अशा शशी गोडबोलेंची भूमिका साकारली होती. (sridevi fifth death anniversary actress film english vinglish to be re released in china)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य
दादासाहेब फाळके पुरस्कार: आलिया, रणबीर ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार, ‘हा’ सिनेमा ठरला बेस्ट जाणून घ्या विजेत्यांची नावे

हे देखील वाचा