श्रीदेवी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री. आपल्या सुंदरतेने आणि अभिनयाने त्यांनी सर्वांनाच अक्षरशः वेड लावले. त्यांनी सर्वच सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले. मात्र त्यांची खरी जोडी रंगली ती अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबत. श्रीदेवी आणि अनिल कपूर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये सोबत काम केले. या दोघांमध्ये सहकलाकारचे नाते तर होते शिवाय ते एकमेकांचे दीर भावजय देखील होते. आज जरी श्रीदेवी आपल्यामध्ये नसल्या तरी नेहमीच त्यांची आठवण निघत असते. अनिल कपूर देखील विविध कार्यक्रमांना त्यांची आठवण काढताना दिसतात. असाच एक किस्सा श्रीदेवी आणि अनिल कपूर यांचा चांगलाच गाजला होता. हा किस्सा अनिल कपूर यांनी श्रीजी गेल्यानंतर झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सांगितला.
आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये अनिल कपूर यांना जीवनगौरव प्रदान केल्यानंतर त्यांनी श्रीजी यांची एक आठवण सर्वांना सांगितली. ते म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा श्रीदेवी यांना भेटायचो तेव्हा तेव्हा त्यांना नमस्कार करायचो. त्या हसायच्या आणि म्हणायच्या अनिल हे काय करत आहात? मला का नमस्कार करता? यावर मी म्हणायचो, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला वाकून नमस्कार करतो तेव्हा मला वाटते की तुमच्यात असणारी प्रतिभा थोडी तरी माझ्यात येईल.” हे ऐकून तिथे उपस्थित असणारे बोनी कपूर यांचे डोळे पाणावले आणि अनिल कपूर यांचा हा किस्सा ऐकून सर्वच जणं भावुक झाले होते.
तत्पूर्वी अनिल कपूर यांचे मोठे भाऊ असणाऱ्या बोनी कपूर यांनी १९९६ साली श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासाठी त्यांच्या पहिल्या पत्नी असलेल्या मोना कपूर यांना घटस्फोट देखील दिला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी मिस्टर इंडिया, रूप की रानी चोरों का राजा, जुदाई, लाडला, लम्हे, मिस्टर बेचारा आदी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता