Friday, March 29, 2024

‘त्या’ अभिनेत्रीच्या अलैंगिकतेबद्दल कळाल्यावर लोक म्हणाले, “तू आणखी प्रयत्न कर”

आपणा सर्वांना टीव्हीची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री सृति झा ‘कुमकुम भाग्य’ची प्रज्ञा म्हणून माहितच असेल. ती प्रज्ञा जी तिच्या कुटुंब आणि स्वतः साठी प्रेम ही नाकारते. ती प्रज्ञा जी तिच्या हक्कांसाठी जगाशी लढा देऊ शकते.

26 फेब्रुवारी याच प्रज्ञा अर्थात सृति झा हिचा वाढदिवस आहे. बिहारच्या बेगूसरायमध्ये जन्मलेली आणि कोलकाता ते नेपाळनंतर दिल्लीमध्ये वाढलेली सृति खऱ्या आयुष्यातही तितकीच धाडसी आणि बिंदास आहे. सृतिने एका मुंबई फेस्टमध्ये खुलासा केला की ती असेक्सुअल आहे. म्हणजेच तिला प्रेमामध्ये रस आहे, परंतु लैंगिक संबंधात रस नाही. सृतिच्या या खुलास्यात फक्त तिची बाजू नव्हती, तर एक वेदनाही होती की लोक तिला समजून घेत नाहीत.

मुंबईत सृतिचा कबुलीजबाब
जानेवारी 2020 मध्ये सृतिने मुंबईमध्ये एका कवितेद्वारे तिच्या या गोंधळाचा आणि सामर्थ्याचा उल्लेख केला होता. तिने तिच्या या कवितेला ‘कन्फेन्शन्स ऑफ अ रोमँटिक असेक्सुअल’ असे शीर्षक दिले होते, हा एक रोमँटिक असेक्सुअलचा कबुलीजबाब होता.

“मी माझ्या ‘फर्स्ट टाइमसाठी’ एक्साईटेड नव्हते”: सृति झा
सृति तिच्या कवितेत म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा बर्‍याच गोष्टी सांगितल्या गेल्या. बरेच नियम बनवले गेले. एकमेकांचा हात धरणे आणि इश्कबाजी करणे योग्य होते. पण यापेक्षा अधिक काही नाही. मी यापुढचा ताल आणि यमक पकडू शकले नाही. जेव्हा प्रत्येकजण त्यांच्या ‘फर्स्ट टाइमसाठी’ तयार होता, तेव्हा माझा कॉस्‍मि‍क अलार्म बंद झाला. यासाठी मी तयार नव्हते, आणि मला याची उत्सुकताही नव्हती.”

लोक म्हणाले: “तू आणखी प्रयत्न कर”
सृति पुढे म्हणाली, “मी बर्‍याचदा प्रेमात पडले. कधी चांगले अनुभव आले तर कधी वाईट. पण ‘ते’ म्हणजेच सेक्स माझ्या मनात कधीच नव्हते आणि तो मला माझा शाप वाटला. म्हणून मी प्रत्येक वेळी हे टाळण्याचा प्रयत्न करायचे. पण जेव्हा मी ‘ते’ केले तेव्हा मला वाटले की हे माझ्यासाठी नाहीच. प्रत्येक वेळी जेव्हा असे झाले, तेव्हा मी ‘मी’ नव्हतेच. जेव्हा त्यांनी ‘नाही म्हणजे नाही’ (No means no) अशी घोषणा दिली तेव्हा मला आनंद झाला. परंतु, मी जेव्हा ‘नाही’ असे म्हटले तेव्हा लोक म्हणाले की, तू आणखी प्रयत्न कर.”

“प्रेमाची अडचण नाही; पण सेक्स ही एक समस्या आहे”
सृति या कवितेत पुढे म्हणते, ‘मला प्रेमाची अडचण नाही किंवा मला किस करणे, मिठी मारणे किंवा केसांत हात फिरविणे आवडत नाही, असे नाही. मला ते खुप आवडते. पण सेक्स, त्यासाठी मी नाही. मला याबद्दल कुतूहलही नाही आणि मी अशीच आहे.”

सृतिने विचार करण्यासाठी नवा दृष्टीकोण दिला; सलाम!
सृतिच्या या कवितेने आपल्याला माणूस म्हणून विचार करण्याची एक नवीन पद्धत दिली आहे. आपल्याला असे शिकवले की, आपण विचार करून आणि समजून घेतले पाहिजे की एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ शकते. हे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे आणि यात कोणतेही नुकसान नाही किंवा हा आजारही नाही. हे व्यक्तिमत्व आहे. जसे एखाद्याला लाल रंग सर्वात जास्त आवडत असेल तर, एखाद्याला तो अजिबातच आवडत नसेल.

हे देखील वाचा