Thursday, July 18, 2024

RRR | एसएस राजामौली यांनी पूर्ण केले ज्युनिअर एनटीआरला दिलेले वचन, समोर आला ‘तो’ व्हिडिओ

२५ मार्च रोजी रिलीझ झालेल्या ‘आरआरआर’ची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनित हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटात कठोर परिश्रम केल्यानंतर, आता त्याचे यश साजरे करण्याची वेळ आली आहे. अलीकडेच, हैदराबादमध्ये ‘आरआरआर’च्या यशाचा एक भव्य सोहळा झाला। ज्यामध्ये चित्रपटाचे स्टार, दिग्दर्शक आणि क्रू सदस्यांनी खूप मजा केली. त्याचवेळी, या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

पूर्ण केले ज्युनियर एनटीआरला दिलेले वचन
एसएस राजामौली यांनी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत, अभिनेता ज्युनियर एनटीआरला दिलेले वचन पूर्ण केले. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान, ज्युनियर एनटीआरने राजामौली यांच्याकडून वचन घेतले होते की, ते सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटाच्या हिट गाणे ‘नाटो नाटो’ची सिग्नेचर स्टेप करतील. ते वचन दिग्दर्शकाने या पार्टीमध्ये पूर्ण केले. इंस्टाग्रामवर ‘आरआरआर’च्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आमचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत ज्युनियर एनटीआरला दिलेले वचन पूर्ण केले.” (ss rajamouli danced fiercely at the success party of rrr fulfilled the promise made to jr ntr)

चित्रपटाने हिंदीत कमावले २०० कोटी
कमाईच्या बाबतीत हा चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटाने एकूण ७०० कोटींचा व्यवसाय केला असून, हिंदी बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’नंतर हा साऊथ चित्रपट बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटाला खूप पसंती दिली जात असून, चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट सुरू आहे. ‘आरआरआर’ ही क्रांतिकारी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित सत्य कथा आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा