तिच्या नावाची सोशलवर असते बारा महिने चर्चा, फोटोंवर पडतो लाईक्सचा पाऊस; आज तुम्हीही ओळख करून घ्या


मोनालीसा! हे नाव ऐकलं किंवा वाचलं की आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहतं. ते म्हणजे द लिओनार्डो दा विंची या महान चित्रकाराने काढलेलं चित्रं मोनालीसा! परंतु जे भोजपुरी सिनेमाचे फॅन असतील त्यांच्यासोबत मात्र असं काहीही होत नसेल त्यांना फक्त एकच मोनालीसा आठवत असेल ती म्हणजे अभिनेत्री, गायक, डान्सर मोनालीसा! या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य हे फारच चर्चेत राहिलं आहे. याच बद्दल आज आपण बोलणार आहोत.

मोनालीसा हे भोजपुरी चित्रपटातील एक मोठं नाव आहे. परंतु या इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर मोनालीसा ही तिच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एक व्यक्तीसोबत नात्यात होती. दोघेही जवळपास ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. परंतु एक दिवस अचानक दोघांचाही ब्रेकअप झाला आणि ते वेगळे झाले. माध्यमांनुसार मोनालीसा सोबत राहणाऱ्या व्यक्तीचं नाव हे मदन होतं तर तो मोनालीसापेक्षा वयाने खूपच मोठा होता. या मंडळींशी ब्रेकअप नंतर मोनालीसाला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये मोठा ब्रेक मिळाला.

मोनालीसाने भोजपुरी सिनेमांमध्ये आपला जम बसवला. मोनालीसाने आतापर्यंतच्या करियरमध्ये १००हुनही अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशातच एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिची ओळख अभिनेता विक्रांतसोबत झाली. हळू हळू दोघांमधली जवळीक ही वाढू लागली. चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

मोनालीसा ही बिग बॉसच्या घरात सुद्धा जाऊन आली आहे. इतकंच नाही तर बिग बॉसच्या घरातच या दोघांनीही लग्न देखील केलं आहे. बिग बॉसच्याच घरात या दोघांनीही लग्नाच्या सप्तपदी पूर्ण केल्या. आणि आज दोघेही एक सुखी संसारिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. परंतु आपल्याला ठाऊक आहे का की मोनालीसा हे या अभिनेत्रीचं खरं नाव नाहीये ते…

मोनालीसाचं खरं नाव अंतरा बिस्वास आहे. ती बंगाली कुटुंबातून आली आहे. तिने जेव्हा चित्रपट क्षेत्रात करियर करायचं ठरवलं तेव्हा नाव बदलायचं ठरवलं. असं बोललं जातं की तिच्या काकांच्या सांगण्यावरून तिने अंतरा हे नाव बदलून मोनालीसा केलं होतं. मोनालीसाने आतापर्यंत भोजपुरी, हिंदी, तामिळ, तेलुगु, कानडी, ओडिया, बंगाली अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये आता पर्यंत काम केलं आहे. नजर, नमक ईश्क का या काही मालिकांमधूनही आपल्याला ती पाहायला मिळाली आहे.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.


Leave A Reply

Your email address will not be published.