व्हिडिओ: तबला वाजवणे साराला पडले महागात, ‘चरसी’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

story sara ali khan playing tabala people trolled her after video goes viral


बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान दररोज काहीतरी नवनवीन करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. ती आपल्या फोटो आणि व्हिडिओमार्फत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असते. ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा शायराना अंदाज पाहायला मिळाला होता. काही वेळा तिचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडतो, परंतु काही वेळा साराला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच आता ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

साराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तबला वाजवताना दिसत आहे. जरी सारा केवळ तबला वादन करण्याचा अभिनय करत आहे, परंतु लोकांनी तिला यावरही ट्रोल केले आहे.

सारा अली खान सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नेहमी काहीतरी मजेदार पोस्ट करत राहते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. काही युजर्सनी साराला ट्रोल केले, तर काहींनी तिचे कौतुकही केले. नेटकऱ्यांनी साराच्या एक्सप्रेशन्स, अभिनय कौशल्यांवर कमेंट्स केल्या आहेत. तसेच एका युजरने ‘चरसी’ असेही लिहिले आहे.

सारा मागच्या काही दिवसात राजस्थानला गेली होती. तिथून ती सुंदर फोटो शेअर करत आहे. तिने आई अमृता सिंगसोबत अजमेर शरीफ दर्ग्यातील फोटो पोस्ट केले होते. ती जयपूरच्या खाद्याचा आनंदही घेत होती आणि त्याची झलक इंस्टा स्टोरीवर चाहत्यांनाही पाहायला मिळाली.

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सारा आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात धनुष आणि अक्षय कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, पण आता ऑगस्टमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.