Wednesday, June 26, 2024

‘पद्म’ पुरस्कारासाठी सुधीर मुनगंटीवार करणार अशोक सराफांच्या नावाची शिफारस; अभिनेते म्हणाले…

चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य कलाकार होऊन गेले, आहेत आणि येत राहतील. मात्र, काही कलाकार असे असतात, जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजावर कायमचं आपलं नाव कोरतात. असेच एक अभिनेते अशोक सराफ आहेत, मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते म्हणजे अशोक सराफ होय. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. तसेच आजही करतात. अशोक सराफ यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अशोक सराफ हे नेहमीच त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. त्यांची एक वेगळीच क्रेझ आहे.

अशोक सराफ (Ashok Saraf ) मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. भूमिका कोणतीही असो, त्यामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम त्यांनी केले आहे. अभिनय तर असा ठसकेबाज की, त्यांचा सिनेमा विसरणे हे एखाद्या चाहत्यासाठी अशक्यच गोष्ट म्हणावी लागेल. याच त्यांच्या अभिनयाची दखल घेण्यात आली आहे. अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी अशोक सराफ यांच्या नावाची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पुण्यात केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “स्वत: रडण्याचा अभिनय करून प्रेक्षकांनी रडवणं हे खूप कठीण काम आहे, त्याचे प्रमाणे हसण्याचा अभिनय करून समोरच्याला हसवणं हे त्याहुन महाकठीण काम आहे. पण हेच काम अशोक सराफ यांनी गेली कित्येक वर्ष केले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. दरम्यान, पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नावं सुचवायची असतात, त्याचा मी अध्यक्ष आहे. खूप विचार केला पण काही सुचत नव्हत. आता इथे आल्यावर माझा निर्णय पक्का झाला की, महाराष्ट्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांचं नाव निश्चितपणे पाठवलं पाहिजे आणि ते आम्ही पाठवणार,” अशी घोषणा त्यांनी बोलताना केली.

यावर अशोक सराफ यांनी देखील त्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “मी माझं कर्तव्य समजतो की. मी इथे एकटा उभा नाही. तुम्ही सगळे माझ्या पाठिशी उभे आहात. आजचा सत्कार मी आयुष्यात विसरू शकत नाही. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना प्रेक्षकांकडून मिळणारे पाठबळ फार महत्वाचे असतात, त्याशिवाय कलाकाराच्या कलेला यश मिळत नाही. मला कायमच असे पाठबळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी दिले.”

अधिक वाचा- 
तीन लेकरं पदरात असताना कनिका कपूरने घेतलेली सोडचिट्टी, 44व्या वर्षी पुन्हा बांधली लगीनगाठ
संगीतविश्व समृद्ध करणारे संगीतकार अजय- अतुल, वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

हे देखील वाचा