Saturday, June 15, 2024

तुरुंगात असूनही सुकेशला वाटते जॅकलीनची चिंता; म्हणाला, ‘काळजी करू नकाे…’

सुकेश चंद्रशेखरच्या ईडी प्रकरणात तीन दिवसांची कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सुकेशला शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी)ला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले, जिथे त्याने न्यायाधीशांसमोर आणि मीडियाशी संवाद साधताना बरेच काही सांगितले. जॅकलिन फर्नांडिसचा या 200 कोटींच्या फसवणुकीशी काहीही संबंध नाही, असे सुकेश म्हणाला.

सुकेश म्हणाला की, “जॅकलीनला काळजी करण्याची गरज नाही, तिच्या सुरक्षेसाठी मी इथे आहे.” सुकेशचं जॅकलीनवरचं प्रेम कमी होण्याचं नावच घेत नाहीये. तुरुंगात असूनही त्याला जॅकलिनची काळजी आहे. त्याने अभिनेत्रीला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. तर झाले असे की, सुकेश व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उच्च सुरक्षेमध्ये कोर्टरूममधून बाहेर पडत होता, त्यादरम्यान त्याला जॅकलिनच्या आरोपांबद्दल विचारण्यात आले, ज्यावर ताे म्हणाला, “मला तिच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. असे म्हणण्यामागे तिचे कारणे आहेत. माझ्याकडून तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.”

सुकेश सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. या प्रकरणात त्याच्यासोबत दीपक रामदानी नावाच्या व्यक्तीचेही नाव समोर आले आहे. त्यामुळेच शुक्रवारी (दि.24 फेब्रुवारी)ला सुकेशसोबत दीपकलाही पटियाला कोर्टात हजर करण्यात आले. सुकेशला 3 दिवस आणि दीपकला 5 दिवस ईडी रिमांडमध्ये ठेवण्यात येणार आहे.

सुकेशच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात केवळ जॅकलिन फर्नांडिसच नाही, तर अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही, अभिनेत्री निक्की तांबोळी आणि टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना यांचीही नावे आहेत. अलीकडेच चाहत खन्ना हिने खुलासा केला होता की, “सुकेशने तिला तुरुंगातच गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले होते. एवढेच नाही, तर सुकेशने तिला सांगितले होते की, ‘तो तिच्या मुलांचा बाप होण्यास तयार आहे.'”

केवळ चाहत खन्नाच नाही, तर इतर अभिनेत्रीही सुकेशला तुरुंगात भेटल्या आहेत. तिहार तुरुंगात मागच्या गेटमधून आलिशान वाहनांतून त्यांची ओळख सुकेशशी झाली. यावेळी सुकेशसोबत इतर काही लोकही उपस्थित होते.(sukesh chandrashekhar said bollywood actress jacqueline fernandez has not to worry i am here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘स्वत:बद्दल अभिमान बाळगायला हवा…’ म्हणत तेजश्री प्रधानाने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

‘जर मुघल एवढेच विनाशकारी होते तर…’ नसीरुद्दीन शाह यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

हे देखील वाचा