ऍलेप्पेच्या प्राचीन ठिकाणांवर होतेय ‘या’ चित्रपटाची शूटिंग, धनंजय आणि सुमन लुटतायत केरळचा आनंद

Suman Ranganath And Dhananjaya Are Shooting In Alleppey Kerala


अभिनेता धनंजय आणि सुमन रंगनाथन सध्या केरळच्या सुंदरतेचा आनंद लुटताना दिसत आहेत. दोघांनीही ‘तोतापुरी’ या चित्रपटाचे सेट जॉईन केले आहे. या चित्रपटाची शूटिंग ऍलेप्पेच्या प्राचीन ठिकाणांवर केली जात आहे. विजय प्रसाद चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर सुरेश हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

या टीमने नुकतेच अभिनेता जग्गेश यांच्यासोबत शूटिंगचा शेवटचे स्केड्यूल पूर्ण केले आहे. हे स्केड्युल बन्नूरजवळ एका गावामध्ये केले होते. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे काही भाग म्हैसूरमध्येही शूट करण्यात आले आहेत.

जग्गेश आणि विजय प्रसाद  हे आपल्या विनोदासाठी ओळखले जाता. या चित्रपटातही चाहत्यांना त्यांचा विनोद पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वीना सुंदर आणि दत्तन्नाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. जग्गेश आणि विजय प्रसाद यांचा हा एकत्र काम करत असलेला दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी ‘नीर डोस’ चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्री सुमन रंगनाथ आणि धनंजय पहिल्यांदा स्क्रीनवर दिसतील. तोतापुरीमध्ये अनूप सीलिन यांनी म्युझिक दिले आहे.

सुमन रंगनाथनने कन्नडसोबतच बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दक्षिण भारतातील ही अभिनेत्री चित्रपटांपेक्षा आपल्या लिंक अप्समुळे चर्चेचा विषय ठरत असते. ही अभिनेत्री सर्वाधिक चर्चेत तेव्हा आली होती, जेव्हा तिचे पहिल्यांदा नाव फरहान अख्तरच्या ‘आशिकी’ फेम अभिनेता राहुल रॉयसोबत जोडले गेले होते.

याव्यतिरिक्त उद्योगपती उरू पटेल यांच्यासोबतचही ती रिलेशनशीपमध्ये राहिली आहे. त्यांनी चित्रपट निर्माता बंटी वालियासोबत लग्न केले होते. परंतु सन २००७ मध्ये दोघेही वेगळे झाले होते. त्यानंतर सुमनने सन २०१९ मध्ये उद्योजक साजन चिन्नपासोबत लग्न केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! बॉलिवूड कपल रणबीर- आलिया करणार होते सर्वांसमोर ‘लिप- लॉक’, पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


Leave A Reply

Your email address will not be published.