चित्रपटसृष्टीमध्ये जागा मिळवणे अशी अनेकांची इच्छा असते. काहीजण त्यांच्या डान्स स्टाईलने नाव कमावतात, तर काहीजण त्यांच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावतात. परंतु डान्स आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रातून नावारूपाला आलेला अभिनेता आणि डान्सर म्हणजे सुमेध मुद्गलकर होय. त्याने डान्स आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने २०१२ साली ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तो फायनॅलिस्ट देखील झाला होता. या शोमध्ये तो सहभागी झालेला शनिवारी (१८ डिसेंबर) रोजी १२ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर त्याचा या शोमधील ऑडिशनचा एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुमेधने (Sumedh) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या ऑडिशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सुमेध ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या मंचावर अत्यंत सुंदर पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने एक सुंदर कॅप्शन देऊन त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, “स्क्रीनवरील पहिला परफॉर्मन्स – १८ डिसेंबर २०१२. आजपर्यंत ९ वर्षे. मला आठवतंय की, मी माझी सगळी मेहनत देत होतो, जेणेकरून मला ऑडिशनमधून बाहेर काढले जाऊ नये. या तारखेपासून, जीवन एक रोलर कोस्टर झाले आहे. या काळात अनेक चढ-उत्तर आले. ज्यांनी मला पाठिंबा दिला, ज्यांनी मला मार्गदर्शन केले, मला फटकारले, माझ्याकडे काहीही नसतानाही मला आर्थिक मदत केली त्यांचा मी आभारी आहे. माझे मार्गदर्शक, माझे मित्र, माझे सहकारी! ज्यांनी मला संधी दिली! मी आभारी आहे.” (sumedh mudgalkar share his dance maharashtra dance audition video on instagram)
त्याने पुढे लिहिले की, “धन्यवाद माझ्या ‘सुमेधियां’. मला इतकं प्रेम कुठून मिळालं! पण मी इतकेच म्हणू शकतो की, मी कृतज्ञ आहे! माझे कुटुंब, माझे जवळचे लोक आणि मला माझे चाहते असल्याचा अभिमान आहे. आणि मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला आणि ज्यांच्या तोंडून वाईट वाटले. जे लोक अजूनही गुप्तपणे नापसंत करतात. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला माझ्या स्वतःच्या जीवनाकडे, पाहण्यासाठी वेगवेगळी अंतर्दृष्टी दिली.”
त्याने पुढे लिहिले की,”जेव्हा तुमच्यापैकी काही माझ्यावर खूप कठोर होते, तेव्हा मी माझ्यातील दोष शिकलो, कधीकधी मी माझ्यातील चांगल्या गोष्टींची कदर करायला शिकलो की, इतरांनी त्याची कदर करण्याची वाट न पाहता. आणि त्यामुळे आत्मप्रेम किती महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं! तुम्ही हे वाचत असाल, तर तुम्ही कोणत्याही श्रेणीत येत असाल! जाणून घ्या, माझे जीवन आणि माझा प्रवास, तुमच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे!”
सुमेध एक डान्सरसोबत एक अभिनेता देखील आहे. त्याने व्ही चॅनेलवरील ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकेत काम केले होते. तसेच त्याने ‘व्हेंटिलेटर’, ‘मांजा’, ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये देखील भाग घेतला होता. सध्या तो ‘राधाकृष्ण’ या मालिकेत काम करत आहे.
हेही वाचा :
‘सुंदर असणे म्हणजे तुम्ही स्वतः’, म्हणत रिंकू राजगुरूचा सोज्वळ व्हिडिओ आला समोर
अंकिता अन् विकीने ‘मिस्टर एँड मिसेस’ जैनचा मॅचिंग नाईट सूट घालून केलं ‘हे’ काम, व्हिडिओ व्हायरल