‘सुंदर असणे म्हणजे तुम्ही स्वतः’, म्हणत रिंकू राजगुरूचा सोज्वळ व्हिडिओ आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे बोटावर मोजण्याइतके कलाकार आहेत ज्यांना केवळ एकाच चित्रपटाने प्रसिद्धी मिळाली आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूने तिच्या ‘सैराट‘ या चित्रपटातून संपूर्ण देशभर प्रसिद्धी मिळवली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटीपेक्षाही जास्त गल्ला केला होता. रिंकूचा हा पहिलाच चित्रपट होता. १६ वर्षाची असताना तिने या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सोशल मीडियावर सध्या ती चांगलीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

रिंकूने (Rinku) अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती अगदी साधी दिसत आहे. तिने सुंदर पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. केसांची वेणी घालून कपाळी एक छोटीशी टिकली लावली आहे. या व्हिडिओमध्ये ती सुंदर पद्धतीने हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडिओपेक्षा तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Rinku Rajguru share her simple video on social media)

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सुंदर असणे म्हणजे तुम्ही स्वतः, तुम्हाला इतर कोणी नाही, तर तुम्ही स्वतः स्वीकारण्याची गरज आहे.” तिचा हा व्हिडिओ आणि कॅप्शन सगळ्यांना खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “स्वप्नपरी साकारलीया.” तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत का प्रयत्न करत नाहीस?” तसेच आणखी अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

रिंकूने खूप कमी कालावधीत तिचे नाव कमावले आहे. तिने ‘कागर’, ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती ‘झुंड’ आणि ‘२००’ या आगामी चित्रपटात देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला ते प्रतिक्रिया देत असतात.

हेही वाचा :

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून ‘टप्पू’बाबत आनंदाची बातमी! जाणून तुम्हीही व्हाल ‘हॅप्पी’

अंकिता अन् विकीने ‘मिस्टर एँड मिसेस’ जैनचा मॅचिंग नाईट सूट घालून केलं ‘हे’ काम, व्हिडिओ व्हायरल

अर्रर्र! ‘जलपरी’ बनलेल्या नोराला स्ट्रेचरवर पाहून चाहते चिंतेत, ‘दिलबर गर्ल’ला झालंय तरी काय?

Latest Post