‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाचा मामा गोविंदाचे नाव घेऊन अक्षयचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मामाशी पंगा…’


कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ हा प्रसिद्ध कॉमेडी शो नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हास्य आणि मजेशीर किस्से यासाठी हा शो प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. याच दरम्यान या शोमध्ये येणाऱ्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न देखील विचारतात आणि ते चाहत्यांसमोर सर्व शेअर देखील करतात. या शोमध्ये प्रेक्षक पोटधरून हसतात.

या आठवड्यात कपिल शर्माच्या शोमध्ये ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या टीम येणार आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan), आणि दिग्दर्शक आनंद एल राय (Aanand L. Rai) यावेळी उपस्थित राहतील. दरम्यान अक्षयने या शोमध्ये सपनाची भूमिका साकारणारा विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकला (Krushna Abhishek) त्याच्या मामाचे म्हणजेच गोविंदाचे (Govinda) नाव घेऊन त्याची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहुणे म्हणून आलेल्या अक्षय कुमारने कृष्णा अभिषेकची खिल्ली उडवली. तो म्हणाला की, “कधी नकली अमिताभ बनतो, तर कधी नकली जॅकी श्रॉफ, पण मामासोबत खरोखर पंगा घेतला आहे.” हे ऐकून तिथे असलेली सारासोबत सर्वजण मोठमोठ्याने हसायला लागतात. तिथेच कृष्णाची बोलती बंद होते. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

‘द कपिल शर्माचा शो’मध्ये अक्षयने त्याच्या जादूच्या ट्रिक्सने सर्वांना आश्चर्यचकित केले. प्रेक्षकच नव्हे, तर सारा आणि शोची परीक्षक अर्चना पुरण सिंग यांनाही अक्षय कुमारची जादू पाहून आश्चर्य वाटले. अचानक अक्षय आपल्या जादूने अर्चनाजवळ ठेवलेला चष्मा वर वळवतो. याशिवाय कीकू शारदा विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या नुकत्याच झालेल्या लग्नाबद्दल विनोद करताना दिसला.

सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus hotstar) प्रदर्शित होणार आहे. सारा या चित्रपटात बिहारी मुलीची भूमिका साकारत आहे. ती या चित्रपटात तिच्या बॉयफ्रेंड आणि नवरा या दोघांवरही प्रेम करत असते. धनुष तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे, तर अक्षयने तिच्या प्रियकराचा रोल साकारला आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक अतिशय उत्सुकतेने पाहत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!