बिडी जो लैले’ गाण्यावर थिरकल्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील या दोन अभिनेत्री, एकदा पाहाच


सुंदरा मनामध्ये भरली‘ ही एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेला प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळत आहे. मालिकेची कहाणी, डायलॉग आणि पात्रांची वेशभूषा गावाकडची असल्याने सगळ्यांना ही मालिका अगदी जवळची वाटते. मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे जे मुख्य भूमिकेत आहेत. त्या दोघांची जोडी देखील सगळ्यांना खूप आवडते. मालिकेत सध्या एका मागून एक असे ट्विस्ट येतच आहे.

मालिकेत सध्या एक मोठं वळण आलेलं दिसत आहे. मालिकेचा खलनायक दौलतने जहांगीरदार कुटुंबाचे घर आणि सगळी जमीन त्याच्या नावी केली आहे आणि आता तो सगळ्यांना नोकराप्रमाणे वागवत आहे. अशातच अभिमन्यू आणि लतिकाने या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आहे. लतिका नोकराचे रूप घेऊन त्याच्या घरी काम करायला जाणार असते. त्याला धडा शिकवणार असते. परंतु ही गोष्ट अभ्या करतो आणि तो स्त्री वेशात आता दौलतच्या घरी जाणार आहे. (sundara manamadhe bharali actress dance video)

अशातच त्या वेशातील लतिका आणि तिच्या मोठ्या बहिणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लतिका आणि तिची बहीण ‘बिडी जो लैले’ ,या गाण्यावर डान्स करत असतात. त्याचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांना त्या दोघींचा हा जलवा खूप आवडला आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते या डान्स व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मालिकेच्या पुढच्या भागात आता नक्की काय होणार आहे आणि मालिका कोणत्या वळणावर जाणार आहे. हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. तसेच आता अभिमन्यू आणि लतिकाने घेतलेले हे सोंग दौलतला समजल्यावर काय होईल? त्यांचे घर आणि जमीन त्यांना परत मिळेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात घोळत आहेत.

हेही वाचा :

‘तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया,’ म्हणत चाहत्याने केले अमृता खानविलकरच्या ग्लॅमरस लूकचे कौतुक

शाहरुख खानच्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले अंघोळ करतानाचे फोटो, कडाक्याच्या थंडीत वाढवले तापमान

‘रिक्षावाला भाईजान’, पनवेलच्या रस्त्यावर सलमानने चालवली रिक्षा, चाहत्यांनी बनवला व्हिडिओ 

 

 


Latest Post

error: Content is protected !!