शाहरुख खानच्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केले अंघोळ करतानाचे फोटो, कडाक्याच्या थंडीत वाढवले तापमान


शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘फॅन’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मेघा गुप्ता (Megha Gupta) तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. तिने याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यातील तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक करण्यात आले. आता नुकतेच समोर आलेले मेघा गुप्ताचे काही नवीन फोटो चर्चेत आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तिने बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे पाहून सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे.

अंघोळ करताना दिसली अभिनेत्री
या फोटोंमध्ये मेघा गुप्ता बाथरूममध्ये अंघोळ करताना दिसत आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेघाने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा शॉवरकडे आहे आणि पाठ कॅमेराकडे आहे. (shahrukh khan fan film co star megha gupta shared pictures from bathroom taking shower)

स्वतः शेअर केले फोटो
मेघा गुप्ताने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे अंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे हॉट फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “थंड पाण्याचे शिंतोडे तुमचे शरीर जागे करते. थंडी तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास प्रवृत्त करते, संपूर्ण शरीरात CO2ची पातळी कमी करते, ज्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. अशा प्रकारे थंड पाण्याचे शॉवर तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी तयार आणि केंद्रित ठेवते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.”

ड्रममध्ये बसून दिल्या पोझ
मेघा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने ड्रममध्ये बर्फाचे तुकडे टाकून फोटोशूट केले होते, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मेघा ध्यानस्थ मुद्रेत दिसत होती. फोटोंमध्ये मेघाने स्टेप टॉप घातलेला दिसत होता. यासोबतच अभिनेत्रीने हलका मेकअपही केला आहे.

अनेक मालिकांमध्ये केलंय काम
मेघा गुप्ताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘कुसूम’, ‘कुमकुम – एक प्यारा सा बंधन’, ‘काव्यांजली’, ‘सीआयडी’, ‘मैं तेरी परछाई हूं’ यांचा समावेश आहे. मेघा सध्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीपासून बऱ्याच काळापासून दूर असली, तरी ती बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत राहत असते. बोल्ड फोटोंसोबतच मेघा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. मेघा गुप्ताचा आतापर्यंत दोनदा घटस्फोट झाला आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!