Friday, March 13, 2026
Home मराठी ‘सवत माझी लाडकी!’, म्हणत लतिकाने केला अभ्याच्या नवीन बायकोसोबतचा व्हिडिओ शेअर

‘सवत माझी लाडकी!’, म्हणत लतिकाने केला अभ्याच्या नवीन बायकोसोबतचा व्हिडिओ शेअर

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ होय. या मालिकेने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. ९ चा ठोका वाजला की, घराघरात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) ही एकच मालिका चालू असते. या मालिकेतील पात्र, त्यांचा संवाद, वेशभूषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंत‌ पडतात. त्यातील लतिका आणि तिच्या सासूचे पात्र तर सर्वांना खूप भावते. तसेच, बाकी अनेक पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. काही दिवसांपूर्वी लतिका आणि अभिमन्यू वेगळे झाले होते, परंतु ते आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

त्या दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी अभिमन्यूच्या लग्नाचा प्लॅन केला. त्यावेळी अभिमन्यूचा भाऊ म्हणजेच आशूला साडी नेसवून लग्न मंडपात बसवले होते, परंतु मध्येच सगळ्यांना तो आशू आहे हे समजते. त्यानंतर मालिकेत चांगलाच हशा पिकतो. अशातच आशूने साडी घातलेली असताना त्याचा आणि लतिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Sundara manamadhye bharali fame akshaya naik share a video on social media)

अक्षयाने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, लतिका आणि आशू चालत येत असतात. लतिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो, तर आशूने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. तो डोक्यावर पदर घेऊन येत आहे. नंतर तो डोक्यावरून पदर काढून दाखवतो. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘सामने जो कौन आया’ हे गाणे लागले आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सवत माझी लाडकी, कशी वाटली अभ्याची खोटी नवरी?” त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ९७ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

हे देखील वाचा