सध्या सिनेसृष्टीतील कलाकारांसोबत फसवणुकीचे, धमक्यांचे, प्रकार वाढताना दिसत आहेत. सोशल मीडिया वरुनही अनेकदा कलाकारांना जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्रींनाही अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागते. असाच प्रकार सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्री कामिनी म्हणजेच पुजा पुरंदरेसोबत घडला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ.
मराठी टेलिव्हिजनवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील कथा आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे ही मालिका घराघरात प्रसिद्ध आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांशी वेगळे नाते आहे. मालिकेत लतिका आणि अभिमन्यूच्या प्रेमात नेहमीच आडकाठी आणणारी कामिनी म्हणजेच अभिनेत्री पूजा पुरंदरेच्या अभिनयाचेही नेहमीच कौतुक केले जाते. नकारात्मक भूमिका साकारुनही अभिनेत्रीने तिची छाप पाडली होती. जरी सध्या ती मालिकेत दिसत नसली तरी तिची भूमिका चांगलीच गाजली होती. परंतु पूजा पुरंदरेबद्दल सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरुन पोस्ट शेअर करत पूजाने ही धक्कादायक बातमी सांगितली आहे. या पोस्टमध्ये पूजाने लिहले आहे की, मागील काही दिवसांपासून मला विविध अकाउंटवरुन डीम आणि टॅग्स येत आहेत. त्याचबरोबर मला अनेक पोस्टलाही टॅग केले जात आहे. हा प्रकार खूप निंदनीय आणि अपमानास्पद आहे. सुरूवातीला मी या गोष्टी हलक्यात घेतल्या दुर्लक्षही केले. मला वाटत या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे हे दुष्परिणाम आहेत.

याबद्दल पुढे बोलताना पूजा म्हणते की, “प्रत्येकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतु मी काल खूप निराश झाले आणि मी आता शांत बसायच नाही असेही ठरवले. म्हणूनच मी त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कृपा करुन तुम्हीही अशा गोष्टींना अजिबात सहन करु नका. आणि इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःबद्दल बोलत राहा.”
दरम्यान पुजा पुरंदरेने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ती सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते.
हेही वाचा –
अरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश
बाप रे! बाराशेपेक्षा अधिक गाणी गाऊन मिळवली प्रतिष्ठा, ‘त्या’ एका कृत्याने घालवली सगळी इज्जतरणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटचे विद्या बालनने केले समर्थन, म्हणतेय ‘आम्हाला पण बघू द्या की त्याचं’










