‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिकाला तर तुम्ही ओळखतच असाल. लतिका अर्थातच अभिनेत्री अक्षया नाईकने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आपले गोड गोंडस रूप घेऊन, तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. अभिनय क्षेत्रात काम करायचे असेल तर टोन्ड फिगरच हवे, अशी समज असणाऱ्यांसाठी अक्षया अपवाद आहे. सध्या ती तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
अक्षया नाईकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती जबरदस्त स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे. यातील तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव अगदी पाहण्यासारखे आहेत. ‘नारळ पाणी’ गाण्यावरील तिचा हा अप्रतिम डान्स सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा डान्स व्हिडिओ शेअर करत, अक्षयाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मराठी स्टाइलमध्ये एक डान्स.” व्हिडिओवर पडलेला लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाहून, हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडल्याचे दिसून येत आहे. चाहते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून, अक्षयाचे भरभरून कौतुक करत आहेत.
अक्षयाबद्दल बोलायचे झाले, तर ती बऱ्याच हिंदी मालिकेमध्ये दिसली आहे. लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मध्ये तिने अनन्याची भूमिका साकारली होती. अभिनयाशिवाय तिला गायन आणि नृत्यामध्येही विशेष आवड आहे. इतकेच नव्हे, तर अक्षया एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. आता अभिनेत्री ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे. यात तिच्या व्यक्तीरेखेला रसिकांकडून खुप प्रेम मिळ आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-