संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी आपापल्या काळात मनोरंजन क्षेत्रात अधिराज्य गाजवले आहे. या दोघांचाही फार मोठा चाहतावर्ग आहे. संजय दत्त आणि सुनील शेट्टी खूप वर्षांपूर्वी एका सिनेमात एकत्र दिसले होते त्यानंतर साधारण १२ ते १३ वर्षानंतर संजय दत्त आणि सुनील शेट्टी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. ‘कांटे’ (२००२), ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’ (२००७) यासारख्या सुपरहिट सिनेमानंतर दोघेही एक पारिवारिक विनोदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘यमला पगला दिवाना’ फिल्म करणारे समीर कर्णिक या विनोदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
संजय दत्त, सुनील शेट्टी, ईशा गुप्ता, जायेद खान, सौरभ शुक्ला आणि जावेद जाफरी या सिनेमांमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा कौटुंबिक विनोदी पद्धतीचा आहे. सुनील शेट्टी आणि संजय दत्त दोघेही विनोदी व्यक्तिरेखेत समोर येणार आहेत. दोघांना एकत्र पाहणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. संजय दत्त आणि सुनील शेट्टी दोघे पंजाबीच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर संजय दत्त, सुनील शेट्टी, ईशा गुप्ता, जायेद खान, सौरभ शुक्ला त्यांच्या व्यक्तिरेखा अजूनही कळलेल्या नाहीत. (suniel shetty and sanjay dutt work together after so many years)
संजय दत्त या सिनेमाबरोबरच ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमात आपल्याला अधिरा ही भूमिका सकरणार आहे. येणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘तुलसीदास ज्युनियर’ या सिनेमामध्ये देखील संजय दत्त झळकणार आहे. ‘केजीएफ’ याच्या भरघोस यशानंतर ‘केजीएफचॅप्टर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय दत्त या सिनेमात एका अनोख्या व्यक्तिरेखेत समोर येणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर भरपूर चालण्याची अपेक्षा आहे.
सुनील शेट्टी ठराविक सिनेमांमध्ये आपल्याला दिसणार आहे. मोजकेच सिनेमे सुनील शेट्टी नेहमी करतो. परंतु जे सिनेमे तो करतो त्यात तो स्वतःची छाप उमटवून जातो. त्यात विनोदी सिनेमा असेल, तर सुनील शेट्टी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच घर करून जातो. सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांना एकत्र बघणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल.
हेही वाचा-