Saturday, June 29, 2024

सुनील शेट्टीने लेक आथिया आणि केएल राहुल बद्दल केला मोठा खुलासा, ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ

बॉलिवूडमध्ये ‘आण्णा’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेत सुनील शेट्टी सध्या आपला आगामी येणारी वेबसिरिज ‘धारावी बॅंक‘ मुळे खूपच चर्चेत आहे. त्याने नुकत्याच दिलेलया मुलाखतीमध्ये त्याची मुलगी आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty) याची लाडकी लेक आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रकेटर केएल राहुल (KL Rahul) हे अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत. हे जोडपे सतत आपल्या नात्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. रोज काहीतरी नवीन बातम्या यांच्या लग्नाविषयी व्हायरल होत असतात. त्यामुळे प्रत्येकालाच यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

झाले असे की, सुनिल शेट्टी आपली आगामी येणारी वेबसिरिज धारावी बॅंकच्या लॉन्च इवेंटमध्ये पोहोचले होता, तेव्हा काही रिपोर्टरने त्यांना आथियाच्या लग्नाविषयी काही प्रश्न विचारले होते. तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, ‘आथियाचे लग्न लवकरच होणार आहे.’ म्हणजे हे पक्क आहे की आथिया आणि राहुलचे लग्न होणारच.

 

View this post on Instagram

 

अभिनेत्याने हे पहिल्यांदाच सांगितले नाही. यापूर्वी देखिल अभिनेत्याने लग्नाविषयी वक्तव्य केले होते की, “जसे मुलं म्हणतील की, “लग्न करुन द्या तर लगेच त्यांचे लग्न केले जाईल.सध्या तर राहुल आशिया वर्ल्डकपमुळे साउथ अफ्रिका टूरवर आहे. जेव्हा मुलांना टाइम मिळेल तेव्हा त्यांचे लग्न केले जाइल. एका दिवसात लग्न नाही होउशकत ना?”

 

View this post on Instagram

 

आथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी 2021 मध्ये आपल्या नात्याला जगासमोर आणले होते, तेव्हा ती अहान शेट्टी (Ahan Shetty) चा पहिला चित्रपट ‘तडप’ याच्या कार्यक्रमामध्ये खुलासा केला होता आणि मीडियासमोर तिने राहुलसोबत पोजही दिले होते. यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर केले. काही दिवसापूर्वी सुनिल राहुलच्या एका सामन्यामध्ये हजेरी लावतानाही दिसला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘तु मेरा है और मेरा ही रहेगा!’ शेहनाज गिलच्या भाषणाने भावूक झाले चाहते, पाहा व्हायरल व्हिडिओ
‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या 60व्या वर्षी थाटला संसार, सोशल मीडियावर मिळाले खरे प्रेम

हे देखील वाचा