Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड अखेर ‘Gadar 2’ने 300 कोटींचा आकडा पार केलाच, 8व्या दिवशी सिनेमाने केली तगडी कमाई

अखेर ‘Gadar 2’ने 300 कोटींचा आकडा पार केलाच, 8व्या दिवशी सिनेमाने केली तगडी कमाई

मागील आठवड्यात 11 ऑगस्ट रोजी सनी देओल याचा ‘गदर 2‘, तर अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2‘ सिनेमे रिलीज झाले होते. एकीकडे सनीच्या सिनेमाने दरदिवशी दोन आकडी कमाई करत 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. दुसरीकडे, अक्षयच्या सिनेमाला 100 कोटींचा आकडाही पार करता आला नाही. चला तर, सिनेमाच्या आठव्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात…

‘गदर 2’ 300 कोटींच्या क्लबमध्ये
सनी देओल (Sunny Deol) अभिनित ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने 7 दिवसातच 284.63 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, 8व्या दिवशीही सिनेमाची कमाई दोन आकडी राहिली. झी स्टुडिओने इंस्टाग्राम पोस्ट करून सांगितले की, सिनेमाने आठव्या दिवशी 20.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच सिनेमाने आता एकूण 305.13 कोटी रुपये कमावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

सिनेमाची दिवसानुसार आतापर्यंतची कमाई
पहिल्या दिवशी ‘गदर 2’ने 40.10 कोटी रुपये कमावले होते. तसेच, दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.70 कोटी, चौथ्या दिवशी 38.70 कोटी, पाचव्या दिवशी 55.40 कोटी, सहाव्या दिवशी 32.37 कोटी, सातव्या दिवशी 23.28 कोटी आणि आता आठव्या दिवशी 20.50 कोटी रुपये कमावल्याचे निर्मात्यांनीच सांगितले आहे.

‘ओएमजी 2’ 100 कोटींच्या जवळ
एकीकडे ‘गदर 2’ 300 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे, दुसरीकडे अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) अजूनही 100 कोटी रुपये कमावू शकला नाहीये. सिनेमाने 7 दिवसात 85.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने आठव्या दिवशी 5.60 कोटी रुपये कमावले आहेत. अशात सिनेमाची कमाई 90.65 कोटी रुपये झाली आहे.

‘ओएमजी 2’ची दिवसानुसार आतापर्यंतची कमाई
पहिल्या दिवशी ‘ओएमजी 2’ने 10.26 कोटी रुपये कमावले होते. तसेच, दुसऱ्या दिवशी 15.30 कोटी, तिसऱ्या दिवशी 17.55 कोटी, चौथ्या दिवशी 12.06 कोटी, पाचव्या दिवशी 17.10 कोटी, सहाव्या दिवशी 7.20 कोटी, सातव्या दिवशी 5.58 कोटी आणि आता आठव्या दिवशी रिपोर्ट्सनुसार, 5.60 कोटी रुपये कमावले आहेत. (sunny deol film gadar 2 more than 300 crore box office day 8 collection)

महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद! Heart Attackमुळे ‘या’ अभिनेत्याचे 25व्या वर्षी निधन, मुंबईतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
तो आला…त्याने गायले…आणि तो जिंकला, अमिताभ बच्चन यांच्या एका फोनने बदलवून टाकले दलेर मेहंदींचे आयुष्य

हे देखील वाचा