बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होऊन आता एक आठवडा उलटला आहे. असे असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. यासोबतच सिनेमा दिवसेंदिवस कमाईचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ओपनिंग डेपासून शानदार कमाई करणाऱ्या ‘गदर 2’ने रिलीजच्या सातव्या दिवशीही शानदार कमाई केली आहे. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…
‘गदर 2’ने रिलीजच्या 7व्या दिवशी किती कमावले?
सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमा छप्परफाड कमाई करत आहे. सिनेमा देशभरात गाजत असून रिलीजच्या 6 दिवसातच 250 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. अशात आता रिलीजच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. 17 ऑगस्ट) किती कमाई केली, याचे सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सातव्या दिवशी सनी देओलच्या सिनेमाच्या कमाईत घसरण झाली आहे. ‘गदर 2’ने सातव्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले आहेत. ‘गदर 2’ सिनेमाची एकूण कमाई आता 283.35 कोटी रुपये झाली आहे.
‘गदर 2’ पार करणार 300चा आकडा?
‘गदर 2’च्या कमाईचा वेग पाहता हा सिनेमा लवकरच 300 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होईल असे बोलले जात आहे. आशा व्यक्त केली जात आहे की, या वीकेंडल सिनेमा 300 कोटी रुपयांचा आकडा नक्की पार करेल.
‘गदर 2’ 2023चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
खरं तर, ‘गदर 2’ हा ‘पठाण’ सिनेमानंतर 2023चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा देशातील सिनेमा बनला आहे. वृत्तांनुसार, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘पठाण’ सिनेमाने भारतात 543.05 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘गदर 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 242.20 कोटी कमावणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमालाही मागे सोडले आहे. (sunny deol movie gadar 2 box office collection day 7 know how much earn)
महत्त्वाच्या बातम्या-
देशातच नाही, तर जगभरात गाजतोय रजनीकांतच्या ‘Jailer’चा डंका, वाचा सिनेमाने 8व्या दिवशी किती छापले
मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर! अभिनेत्याने कमी वयात सोडलं जग