बॉलिवूडचा ‘पॉवरहाऊस’ सनी देओल याचा ‘गदर 2‘ सिनेमा 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला. सिनेमा रिलीजपासूनच देशभरात चर्चेत असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सर्वत्र तारा सिंग आणि सकीनाचे तोंडभरून कौतुक केले जात आहे. पुन्हा एकदा चित्रपटगृहात तोच माहोल पाहायला मिळत आहे, जसा 22 वर्षांपूर्वी ‘गदर: एक प्रेम कथा’ सिनेमा रिलीज झाल्यावर पाहायला मिळाला होता. रिलीजनंतर अवघ्या 3 दिवसात ‘गदर 2’ 100 कोटी रुपयांचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला आहे. अशात सनी देओल आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी अभिनेता प्रचंड घाबरलेला आणि त्याच दिवशी सनी देओल रात्रभर रडत आणि हसत राहिला.
नुकतीच दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) आणि सनी देओल (Sunny Deol) यांनी सिनेमाचे यश साजरे करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यादरम्यान सनीने सांगितले की, ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी त्याची स्थिती कशी होती? यासोबतच त्याने असेही सांगितले की, त्याने वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांना काय म्हटले होते.
‘तुम्ही तारा सिंगला पुन्हा जिवंत केले’
यादरम्यान बोलताना सनी देओल म्हणाला की, “धन्यवाद, तारा सिंगला तुम्ही पुन्हा एकदा जिवंत केले. मी सुरुवातीला घाबरत होतो. भीती होती की, ‘गदर’ सिनेमाची गोडी खराब होईल.”
रिलीजच्या दिवशी रात्रभर रडत-हसत राहिला
सनी देओलने पुढे सांगितले की, ‘गदर 2’ सिनेमा रिलीज होताच तो पूर्ण रात्र रडत आणि हसत राहिला. वडील धर्मेंद्र यांच्याबाबतचा मजेशीर किस्सा सांगताना तो म्हणाला की, “सिनेमा रिलीज होण्यापूर्वी मी खूपच तणावात होतो. ज्यावेळी सिनेमा रिलीज झाला, तेव्हा मी पूर्ण रात्र रडत आणि हसत राहिलो. पप्पा माझ्याकडेच होते. त्यांनी मला पाहिले. मी त्यांना म्हटले की, मी दारु पिलो नाहीये. मी खुश आहे, मी काय करू.” तो असेही म्हणाला की, “वडिलांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात काम केले होते. त्यात त्यांचा एक छोटा रोमँटिक सीन आहे. त्यामुळे आमचे जीन्स एकच आहेत.”
View this post on Instagram
‘चांगले सिनेमे बनवेल’
अभिनेत्याने यासोबतच प्रेक्षकांना विनंती केली की, तो हिंदी सिनेसृष्टीला बॉलिवूड म्हणू नये. तो म्हणाला, “आमची इंडस्ट्री बॉलिवूड झाली आहे. आम्ही हिंदी सिनेसृष्टी आहोत. इतर कोणाचे नाव का घ्यायचे? तुम्ही जे आहात, त्याचा अभिमान बाळगा. लाज वाटू देऊ नका. आम्ही कुणापेक्षाही कमी नाहीत. निर्मात्यांनी आता हिंदुस्तानला चांगल्याप्रकारे समजून घ्यावे. मी आपल्या चाहत्यांना वचन देतो की, असेच चांगले सिनेमे बनवेल.”
किती छापले?
सनी देओल याच्या सिनेमाने चार दिवसात जवळपास 173.58 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात म्हटले जात आहे की, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त हा सिनेमा बक्कळ कमाई करत 200 कोटींचा आकडाही पार करेल. (actor sunny deol says he cried and laughed whole night after gadar 2 release)
महत्त्वाच्या बातम्या-
अक्षयच्या ‘OMG 2’ने सोमवारी ओलांडला ‘एवढ्या’ कोटींचा आकडा, ‘ओपनिंग डे’पेक्षा जास्त केलीये कमाई
थांबतच नाहीये ‘Gadar 2’ची सुपरफास्ट एक्सप्रेस! चौथ्या दिवशीही बक्कळ कमाई करत भल्याभल्या सिनेमांना पछाडले