सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिचा एक व्हिडिओ चाहत्यांची चिंता खूप वाढवत आहे. ती अशी अभिनेत्री आहे, जी तिच्या सौंदर्यासोबतच क्यूटनेसमुळे चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती डोक्यापासुन पायापर्यंत रक्ताने माखलेली दिसत आहे. यात ती कापलेल्या ओठांवर आणि दुखापत झालेल्या गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे. त्याचवेळी ती क्युट आणि हैराण करणारे भाव देताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक चाहते नाराज झाले आहे आणि कमेंटमध्ये तिची अवस्था विचारत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये विचारले की, “बेबी डॉलला काय झाले?” त्याचवेळी एका दुसऱ्या युजरने लिहिले की, “अभिनय करतानाही मी तुला या अवस्थेत पाहु शकत नाही.” तसेच हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
खरं तर, ही दुखापत तिला प्रत्यक्षात झाली नाही, तर हा व्हिडिओ शुटिंगच्या दरम्यानचा आहे. या व्हिडिओला तिने सुंदर कॅप्शनही दिले आहे. तिने त्या कॅप्शनमध्ये लिहले की, “एजंट एमच्या आयुष्यातील सामान्य दिवस. मला ही दुखापत कशी झाली हे जाणून घेण्यासाठी #अनामिका पहा.” तिच्या कॅप्शनमध्ये तिने ‘अनामिका’च्या कलाकारांना तसेच मेकअप आर्टिस्टला टॅग केले आहे.
सध्या ती विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ वेबसिरीजमध्ये दिसत असल्याची माहिती आहे. ही वेब सिरीज १० मार्च पासुन एमएक्स प्लेयरवर स्ट्रिम होत आहे. ही एक स्पाय थ्रिलर आहे. ज्यामध्ये ती ऍक्शन सीन करताना दिसत आहे. या मालिकेसाठी तिने गनफू आणि उमा थुरमान यांच्याकडून मार्शल आर्ट आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
- प्रतिभावान अभिनेता अशी ओळख असलेल्या अभय देओलने ‘या’ चित्रपटांमधून दाखवली दमदार अभिनयाची झलक
- टेलिव्हिजनवर लग्न केलेल्या ‘या’ अभिनेत्याने सांगितले लग्न करणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक
- तर ‘या’ कारणामुळे जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख राहिल्या अजूनही अविवाहित, स्वतःच केला खुलासा