भयंकर! सनी लियोनसोबत लहानपणी घडले होते असे काही, जे ती आजपर्यंत विसरली नाही…


सनी लियोन आज बॉलीवूडचा एक नामचीन चेहरा बनली आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सनी स्पर्धक म्हणून आली आणि ती भारताचीच झाली. बिग बॉसमध्ये जेव्हा पहिल्यांदा सनी आली, तेव्हा तिला पाहून अनेक भारतीयांच्या मनात काहीतरी नक्कीच झाले असेल. सनीने भलेही बिग बॉसचे विजेतेपद मिळवले नसेल मात्र तिने या शो च्या निमित्ताने स्वतःसाठी बॉलिवूडची दारे खुली केली होती.

बिग बॉसमध्ये अगदी कमी काळासाठी येऊनही तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि त्याचमुळे महेश भट्ट यांनी तिला त्याच्या चित्रपटासाठी साईन केले. सनीकडे बघता लोकांना तिच्याबद्दल, तिच्या जीवनाबद्दल भरपूर आकर्षण वाटते. कधी कधी त्यांना तिच्या आयुष्याचं हेवा देखील वाटत असेल. मात्र याच सनीने तिच्या बालपणात अनेक क्लेशदायक दिवस अनुभवले आहेत. तिने तिच्या लहानपणी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे.

हो, सनीला तिच्या शालेय दिवसांमध्ये बुली केले जायचे. सनीचा जन्म कॅनडामध्ये एका शीख पंजाबी कुटुंबात झाला. सनी काही काळ कॅनडामध्ये राहिली तर काही काळ अमेरिकेत. सनीने तिच्या एका मुलाखतीदरम्यान अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्या आपण एकूण विश्वास देखील ठेऊ शकत नाही, मात्र तिने या सर्व गोष्टींचा सामना केला आहे.

ती त्या मुलाखती म्हणाली होती, ” मला शाळेत असताना बुली केले जायचे. मी एक लाइट स्किन असलेली भारतीय मुलगी होती शिवाय मला नीट व्यवस्थित तयार देखील होता येत नव्हते. माझे कपडे देखील इतर मुलींप्रमाणे नसल्याने मला बुली केले जायचे. यात कोणतीही मस्त किंवा मजा नसे फक्त बुलिंग असायचे.”

“हे बुलिंग इतके वाईट होते की आजपर्यंत त्यातल्या काही गोष्टी माझ्यासोबत आहेत. त्या भावना माझ्यासोबत आहेत. मला वाटते बुलिंग हे एक सर्कल आहे. कोणी मला बुली केले तर मी देखील दुसऱ्याला बुली करणार मग तो बदला घेण्यासाठी अजून तिसऱ्याला बुली करणार. पण बुलीचे हे सर्कल तोडण्यासाठी पर्यंत केले पाहिजे. बुली करणारे लोकं माझ्यासाठी भित्रट आहेत,” असेही ती पुढे म्हणाली.

एकेकाळी अडल्ट स्टार असलेली सनी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. सनीने तिच्या करियरमध्ये आतापर्यंत जरी कमी सिनेमे केले असले तरी तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्स केले आहेत. तिने तिच्या लूक्सने, तिच्या अंदाजने आणि व्यक्तिमत्वाने करोडो लोकांना वेड लावले. सनी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिला खूप ट्रोल देखील करण्यात आले. तिच्या पूर्वीच्या आयुष्यावरून अनेकांनी तिच्यावर खूप आरोप देखील लावले. मात्र ती या सर्वांकडे दुर्लक्ष करत तिचे काम केले, आणि आज तिने सर्वात मोठ्या मनोरंजनाच्या सृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.