Thursday, July 9, 2026
Home बॉलीवूड पत्नी गौरीसाठी आमिरची खास भेट, 131 कारागिरांनी येवढ्या तासांत घडवली दुर्मिळ माणिकाची अंगठी

पत्नी गौरीसाठी आमिरची खास भेट, 131 कारागिरांनी येवढ्या तासांत घडवली दुर्मिळ माणिकाची अंगठी

आमिर खान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तर तो त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक कारणारमुळे चर्चेत होता. त्याने नुकतेच वयाच्या 60 व्या वर्षी गौरी स्प्रॅट सोबत तिसरे लग्न केले आहे. यांचा हा विवाह 5 जुलै रोजी पार पडला होता. हा विवाह काही जवळची माणसं आणि कुटीबीय मध्ये पार पडला होता. आमिरची तीन मुले, जुनैद, आयरा आणि आझाद, उपस्थित होते आणि गौरीचा मुलगाही त्यांच्यासोबत दिसला. सार्वजनिक गर्दीपासून दूर, आमिर खानने एका अंगठीने हा शांत सोहळा खास बनवला. आमिर खाननी त्याच्या या पत्नीसाठी अतिशय खास आंगठी निवडली आहे. आणि या अंगठीची विषश करुन चर्चा होत आहे. 

आमिर (amir)खानने गौरीसाठी एक नाविन्यापुर्ण नैसर्गिक माणिकाची अंगठी निवडली आहे. जी खरोखरच राजेशाही आहे. या अंगठीमध्ये मादागास्करमधील कॅव्होकोचॉन-कट नैसर्गिक माणिक आहे. हा दुर्मिळ माणिक त्याच्या घुमटासारख्या पृष्ठभागासाठी आणि गडद ऑक्सब्लड रंगासाठी प्रसिद्ध आहे. क्वीनने डिझाइन केलेल्या या अंगठीमध्ये सर्व बाजूंनी 40 नैसर्गिक हिरे जडवलेले आहेत. आणि ही आंगटी बनवुन घेण्यासाठी त्याला तीन महिने लागले होते कारण अशा उत्कृष्ट दर्जाचे माणिक 0.1 टक्क्यांपेक्षा कमी प्रकरणांमध्ये आढळतात.

या अंगठीचे निर्माते, क्वीन ज्वेलर्सने, अंगठीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात म्हटले आहे की ती तयार करण्यासाठी 131 कारागिरांना 256 तासांची मेहनत लागली. क्वीनने प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे, “आमिर खानने आपल्या लग्नाच्या अंगठीसाठी क्वीनची निवड केली. तीन महिन्यांच्या शोधानंतर मादागास्करमध्ये एका दुर्मिळ नैसर्गिक माणिकाचा शोध लागला, जो जगात आतापर्यंत सापडलेल्या सर्व रत्नांपैकी 0.1% पेक्षा कमी आहे.

बोनी कपूरची लेक अंशुला कपूर अडकली विवाहबंधनात, तर या लेखकांसोबत घेतले सात फेरे

हे देखील वाचा