ऍक्शन, थ्रिलर, कॉमेडी, हॉरर यांसारख्या वेगवेगळ्या शैलीतील चित्रपट करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुपरस्टार अजय देवगणचा आवर्जुन उल्लेख होतो. अजय शुक्रवारी (२ मार्च) आपला ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो सध्या चर्चेत आहे. तो अनेक बड्या प्रोजेक्ट्सचा भाग आहे. तो सध्या ज्या चित्रपटामुळे चर्चेत आहे, त्या चित्रपटाचे नाव आहे ‘आरआरआर.’ वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना अजयकडून एक मोठ्ठं सरप्राईझ मिळाले आहे. आता त्याच्या वाढदिवशी या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. त्याचा हा लूक एका मोशन पोस्टरच्या मदतीने जारी केला आहे. स्वत: अजयने आपली पहिली झलक शेअर केली आहेे, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अजय देवगण नेहमीच कोणत्याही चित्रपटातील आपल्या एंट्री सीनला खूपच प्रखर ठेवतो. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे सिंघम चित्रपट. आता ‘आरआरआर’ चित्रपटातीलही त्याचा लूक रिलीझ झाला आहे. तो अंगावरील एक शाल हटवताना दिसत आहे. यामध्ये त्याच्या जबरदस्त भूमिकेचे दर्शन घडते. यामध्ये अजय सैनिकांशी वेढलेला आहे आणि बॅकग्राऊंडला ‘लोड, एम, शूट’ हे तीन शब्द रिपीट होत आहेत.
दसऱ्याला होणार रिलीझ
अजयने पोस्ट शेअर करत लिहिले की, “मला ही उत्साही आणि ताकदवान भूमिका देण्यासाठी धन्यवाद एस. एस. राजामौली.”
अजय देवगणपूर्वी अल्लूरी सीता रामाराजूच्या भूमिकेतील राम चरणचाही लूक रिलीझ झाला आहे. यासोबतच आलियाच्या जन्मदिनी तिचा सीताच्या भूमिकेतील लूकही रिलीझ झाला आहे. चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर हा चित्रपट यावर्षी दसऱ्याच्या दिवसी जगभरात रिलीझ केला जाईल. हा चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या भाषांमध्ये रिलीझ केला जाणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाने थिएट्रिकल अधिकारांमधून रिलीझपूर्वीच तब्बल ९०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटाने रिलीझपूर्वी थिएट्रिकल अधिकारांमधून ५०० कोटी रुपयांची कमाई केली होती.
अजय देवगणबद्दल बोलायचं झालं, तर अजय ‘द बिग बुल’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘मैदान’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज