Wednesday, July 3, 2024

अक्षय कुमार बॉयकॉटवर बोललाच; म्हणाला, ‘लोकांच्या खोडसाळपणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची…’

बॉलिवूडमध्ये सध्या ‘बॉयकॉट ट्रेंड’ चालू असल्याचे दिसते. ‘लाल सिंग चढ्ढा‘ आणि ‘रक्षाबंधन‘ हे दोन चित्रपट मोठ्या प्रमाणावर बॉयकॉट करण्यात आले. सोशल मीडियावरही याच चित्रपटांची चर्चा चालू होती. अनेकांनी या चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे आमिर खान याला खूप कठीण परिस्थितीतून जावे लागले होते. मात्र, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच अक्षय कुमार याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटही बॉयकॉट करण्यात आला होता, पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी बजावली नाही. यामुळे अक्षयने मौन सोडले आहे, आणि ‘बॉयकॉट ट्रेंड’ या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.

अक्षय कुमारने तोडले मौन
कोरोना काळानंतर हिंदी सिनेसृष्टीचे सुगीचे दिवस हरपल्यासारखे झाले आहे. चित्रपटापेक्षा जास्त ‘बॉयकॉट ट्रेंड’ चालत आहेत. नेहमी चित्रपटांना किंवा एखाद्या कलाकाराला सोशल मीडियावर सतत बॉयकॉट केले जात आहे. एवढेच काय, तर काहीवेळा बॉलिवूड इंडस्ट्रीलाच बॉयकॉट केले जात आहे. ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) फेम अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपले मौन सोडले आहे. त्याने ‘बॉयकॉट ट्रेंड’ या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, त्याने या ट्रेंडमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला होणाऱ्या नुकसानीवरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

बॉयकॉट आणि बॉलिवूडवर काय बोलला अक्षय?
नुकताच रिलीझ झालेल्या अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला सोशल मीडियावर खूपच ‘बॉयकॉट’ केले गेले होते. कारण, अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाने तीन दिवसात फार काही चांगली कमाई केली नाही. याचदरम्यान अक्षयने दिलेल्या एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, “चित्रपटांना बॉयकॉट करण्याची खोडसाळपणा काही लोकांद्वारे केला जात आहे. माझे त्या लोकांना एकच म्हणणे आहे की, तुम्ही असे करू नका. कारण, एक चित्रपट बनवण्यासाठी खूप लोकांची मेहनत आणि पैसा जातो. यामुळे खूप लोकांचे नुकसान होते, फिल्म इंडस्ट्रीसोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम करते. त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचेही चांगलेच नुकसान भरपाई करावे लागते. तसेच, कुठे ना कुठे आपण आपल्यालाच नुकसान पोहोचवत असतो आणि याचं गांभीर्य हे सर्व करणाऱ्यांना लवकरच कळेल.”

साऊथ चित्रपटांवरही बोलला अक्षय कुमार
बॉलिवूड बॉयकॉटवर भाष्य केल्यानंतर अक्षय कुमारने साऊथमधील नामांकित चित्रपटाबद्दलही चर्चा केली. “चित्रपट तेव्हाच हिट होतो, जेव्हा तो चांगला बनतो. याच्यामध्ये असे बोलणे चुकीचे ठरेल की, तो साउथ इंडस्ट्रीचा आहे म्हणून चालला. चित्रपट हे त्याच्या चांगल्या प्रदर्शनामुळे गाजतो, ना की नॉर्थ आणि साऊथ यामुळे. आपण असे समजणे फारच चुकीचे आहे,” असे बॉलिवूड खिलाडीचे मत आहे.

याच कारणामुळे त्याचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
प्रियांका चोप्रा ते सुष्मिता सेन, बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनी केली आहे देशसेवा
महिलेला फसवल्यामुळे ‘हा’ कलाकार सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
‘हा राष्ट्रध्वजाचा अपमान’, अभिनेत्रीने क्रॉप टॉप घालून तिरंगा फडकावल्याने भडकले चाहते, शिकवला चांगलाच धडा

हे देखील वाचा