बाबो! अक्षय कुमार आहे जगातील ६ क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती, संपत्ती वाचून फिरतील डोळे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) एका वर्षात अनेक चित्रपट करते, त्यामुळे तिची तुलना अक्षय कुमारशी (akshay kumar) केली जाते. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान तापसीला ‘लेडी अक्षय कुमार’ असे संबोधण्यात आले तेव्हा तापसी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag kashyap) या दोघांनी ही तुलना चुकीची असल्याचे म्हटले. तापसी म्हणाली की, अक्षय कुमारकडून माझा चेक मिळालेला नाही. तो भरपूर कमावतो. तापसी आणि अनुराग सध्या त्यांच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट १९ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

अलीकडेच तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप आरजे सिद्धार्थ कन्ननच्या शोमध्ये पोहोचले होते. जिथे सिद्धार्थने तापसूला ‘लेडी अक्षय कुमार’ म्हटले होते. यावर तापसी म्हणाली की, “मी हे कौतुक नक्कीच स्वीकारेन, जेव्हा माझे मानधन आणि अक्षय कुमारचे मानधन समान असेल, तोपर्यंत मला लेडी अक्षय कुमार म्हणू नका. तो सर्वात जास्त कमाई करणारा आणि सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता आहे आणि मला ते जास्त मिळत नाही. यावर अनुराग म्हणाला, अक्षय कुमार जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे. तापसी म्हणाली, “मी त्याच्या आसपासही नाही.”

माध्यमांतील वृत्तानुसार २०२० मध्ये अक्षय कुमार जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता होता. मासिकाच्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले होते की, अक्षय कुमार एका वर्षात ४८.५ मिलियन डॉलर (सुमारे ३६२ कोटी) कमावतो.

विशेष म्हणजे, तापसी पन्नू आणि अक्षय कुमार यांनी ‘बेबी’, ‘नाम शबान’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तापसीबद्दल सांगायचे तर, ‘दोबारा’ हा तिचा अनुराग कश्यपसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती अनुरागच्या मनमर्जियांमध्ये विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत दिसली होती. तापसीने अनुराग निर्मित ‘सांड की आँख’ या चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दुःखद ! पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन, स्तनाच्या कर्करोगाने होत्या त्रस्त

लहान असल्यापासूनच महेश बाबू आहे स्टार, वडिलांच्या ‘या’ अटीमुळे ९ वर्ष सोडली होती इंडस्ट्री

‘त्यांनी माझं मुस्काड फोडलं…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने उघडे पाडले महेश भट्ट यांचे पितळ

Latest Post