Thursday, June 13, 2024

‘या’ कारणामुळे मुमताज जितेंद्रसोबत रोमॅंटिक सीन करायला घाबरायची; अभिनेत्रीने उघड केले मोठ गुपित

‘बिंदिया चमकेगी, चुडी खाकेगी…’, ‘ये रेशमी जुल्फें, ये शरबती आँखों…’ या गाण्यांचा उल्लेख केला की, सुंदर अभिनेत्री मुमताज यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. मुमताज यांना स्टंट वुमन म्हणूनही ओळखले जाते, त्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. मुमताज यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रथम त्या कुस्तीपटू दारा सिंगसोबत दिसल्या, ज्यांच्यासोबत त्यांनी एक-दोन नव्हे तर जवळपास 15 ते 16 चित्रपट केले. यानंतर मुमताज बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध हिरोईन बनल्या. अभिनेत्री मुमताज 31 जुलै रोजी तिचा 75वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

मुमताज (Mumtaz) यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या सौम्य आणि शांत स्वभावाची स्त्रीअशा होत्या. पण त्या अभिनेत्रीने आपल्या खोडकर कृतीने नायिका होण्याचा सगळा अर्थच बदलून टाकला होता. मुमताज यांनी 70 आणि 80 च्या दशकात एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन मोठ्या पडद्यावर छाप पाडली. केवळ त्यांच्या अभिनयाचेच नाही तर त्यांच्या लूकचे आणि सौंदर्याचेही चाहत्यांना खूप वेड लागले. त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी राजेश खन्ना ते शम्मी कपूरपर्यंत सर्व दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा मुमताज जितेंद्रसोबत चित्रपट करायच होत तेव्हा त्या खूप नाराज व्हायच्या.

माध्यमांशी बोलताना एकदा मुमताजने सांंगितले की, ‘जेव्हा त्या जितेंद्रसोबत काम करायच्या तेव्हा त्याच्यासोबत फ्लर्ट आणि रोमान्स करणे खूप कठीण होते. काणर त्याची गर्लफ्रेंड त्याच्याबद्दल खूप पझेसिव्ह होती. त्यामुळेच त्यावेळी त्याच्यासोबत काम करणं थोडं कठीण होतं. पण जितेंद्रने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि तो माझ्याशी खूप चांगला राहिचा.

मुमताजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, मुमताजने 1974मध्ये मयूर मेधवानीसोबत लग्न केले. त्याचवेळी, लग्नानंतर अभिनेत्री चित्रपटांपासून दूर राहून आपल्या वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. लग्नानंतर हे जोडपे नताशा आणि तान्या मेधवानी या दोन मुलींचे पालक झाले. आपल्या प्रदीर्घ करिअरमध्ये मुमताजने ‘दो रास्ते’, ‘लोफर’, ‘खिलोना’, ‘दुश्मन’, ‘आपकी कसम’ आणि ‘अपराध’ सारख्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Story of birthday special Mumtaz, the actress was afraid to do a romantic scene with Jeetendra)

अधिक वाचा- 
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा
जेव्हा टॉपलेस फोटोने उडवली खळबळ, आतापर्यंत बऱ्याच वादांमध्ये अडकलीय कियारा अडवाणी

हे देखील वाचा