गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर‘ या बहुप्रतिक्षित सिनेमाने चित्रपटगृहात धडक दिली. रिलीजच्या अवघ्या तीन दिवसात या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सिनेमाच्या जगभरातील कमाईविषयी बोलायचं झालं, तर सिनेमाने 220 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या सिनेमाचं बजेटच जवळपास 200 कोटी रुपये आहे. मात्र, या सिनेमात धमाल करणाऱ्या रजनीकांत यांनी जितकी फी घेतली आहे, त्याचा आकडा वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. चला तर, रजनीकांत आणि इतर कलाकारांनी किती मानधन घेतले आहे जाणून घेऊयात…
रजनीकांत यांचे मानधन किती?
सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. रजनीकांत यांनी जवळपास 2 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. ते अखेरचे 2021मध्ये रिलीज झालेल्या ‘अन्नाथे’ सिनेमात झळकले होते. अशात 72 वर्षीय रजनीकांत यांनी ‘जेलर’ (Jailer) सिनेमासाठी घेतलेली फीदेखील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. वृत्तांनुसार, जेलर सिनेमासाठी रजनीकांत यांनी तब्बल 110 कोटी रुपये घेतले आहेत.
इतर कलाकारांचे मानधन किती?
रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त या सिनेमात जॅकी श्रॉफ, मोहनलाल, शिव राजकुमार, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, वियानकन आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. या सिनेमासाठी रजनीकांत आणि इतर कलाकारांच्या मानधनात मोठा फरक आहे. जिथे रजनीकांत 110 कोटी रुपये मानधन (Rajinikanth 110 Crore Fees Jailer) घेत आहेत, तिथे मोहनलाल यांनी फक्त 8 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असलेल्या शिव राजकुमारला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. याव्यतिरिक्त सिनेमात खलनायकाची भूमिका साकारत असलेल्या जॅकी श्रॉफ यांनाही 4 कोटी रुपये मिळाले आहेत.
तमन्नाचे मानधन
रजनीकांत यांच्या सिनेमात मुख्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) हीदखील आहे. या सिनेमात तमन्नाने एक आयटम नंबरही केला आहे. या सिनेमासाठी तमन्नाला 4 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, या सिनेमात सुनील, राम्या कृष्णन आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळाले आहेत. (superstar rajnikanth jailer movie fee will amaze you know fees charged by movie cast)
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीदेवीच्या जन्मदिनी बापलेक भावूक; बोनी कपूर आणि खुशीने शेअर केले कधीही न पाहिलेले फोटो
Ankita Lokhande Father Death: अंकिताने पार पाडलं ‘मुला’चं कर्तव्य, वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा- व्हिडिओ