Monday, September 25, 2023

Ankita Lokhande Father Death: अंकिताने पार पाडलं ‘मुला’चं कर्तव्य, वडिलांच्या पार्थिवाला दिला खांदा- व्हिडिओ

टीव्ही ते रुपेरी पडदा असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या डोक्यावरून मायेचं छत्र हरवलं. शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन झाले होते. ते 68 वर्षांचे होते. अशात त्यांच्यावर रविवारी (दि. 13 ऑगस्ट) अंतिम संस्कार झाले. यादरम्यानचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

आईला सांभाळताना दिसली अंकिता
ओशिवारा येथे अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या वडिलांवर अंत्य संस्कार झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारात पोहोचलेली अंकिता या कठीण प्रसंगी आपल्या आईला आधार देताना दिसली. वडिलांच्या निधनामुळे अंकिता आणि तिची आई पूर्णपणे खचली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अंकिताला तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सांभाळताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अंकिताने पार पाडला मुलाचे कर्तव्य
याव्यतिरिक्त काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यात अंकिता ढसाढसा रडताना दिसत आहे. या कठीण प्रसंगी अंकिताला सर्वात मोठा आधार पती विकी जैनने दिला. तो तिचे सांत्वन करताना दिसत आहे. अंकिताने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात ‘मुला’चे कर्तव्य पार पाडले. तिने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यादरम्यान अनेक टीव्ही कलाकारांनीही हजेरी लावली. अभिनेत्री श्रद्धा आर्या हिच्यासोबतच अनेक कलाकारांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अंकिताच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

कसे झाले निधन?
अंकिताच्या वडिलांचे निधन कसे झाले, हे अद्याप समोर आले नाहीये. 12 ऑगस्टच्या सकाळी अंंकिताचे वडील शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होती. काही काळापूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. खरं तर, अंकिता ही तिच्या वडिलांच्या खूपच जवळ होती. प्रत्येक खास क्षण ती वडिलांसोबत साजरा करायची. मात्र, ती आता आपल्या आईचा आधार देईल.

महत्त्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं
नाद करा पण रजनीकांतचा कुठं! ‘Jailer’ने 3 दिवसात छापले ‘एवढे’ कोटी, आकडा वाचून आकडीच येईल
‘मला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती’, अभिनेत्रीसोबत असं का वागायची आई? स्वत:च केला खुलासा

हे देखील वाचा