काय सांगता! ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन? सलमान खानने दिली हिंट


छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस १५’ च्या सिझनसाठी चाहते खूपच उत्साहित आहेत. ईदच्या खास प्रसंगी सुपरस्टार सलमान खाननेही आपल्या चाहत्यांना ईदची भेट देत शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत सलमान आपल्या अंदाजात शो होस्ट करताना दिसत आहे.

प्रोमोच्या व्हिडिओत सलमानने चाहत्यांनी अनेक हिंटही दिल्या आहेत. मात्र, सोबतच गोंधळातही टाकले आहे. (Superstar Salman Khan Shares First Promo Video of Bigg Boss Season 15 OTT On The Occasion of Eid 2021)

सलमानने चाहत्यांना टाकले गोंधळात
खरं तर सलमानने प्रोमोच्या व्हिडिओत म्हटले आहे की, यावेळी सिझन असा काही असेल की, तो टीव्हीवर बॅन होईल. सलमानने शेअर केलेला बिग बॉसचा हा पहिला प्रोमो व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

टीव्हीवर शो होईल बॅन
व्हिडिओत सलमानने म्हटले की, “यावेळी बिग बॉस इतका क्रेझी, इतका ओव्हर द टॉप असेल की, टीव्हीवर तर थेट बॅन होईल.” यानंतर पाठीमागून एक व्हॉईस ओव्हर येतो, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की, बिग बॉसचे मजे घ्या पहिल्यांदा ओटीटीवर वूटसोबत. टीव्हीवरून ६ आठवड्यांपूर्वीच याचे प्रसारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू केले जाईल. निश्चितच निर्माते आपल्या शोमार्फत ऍप्लिकेशनचेही प्रमोशन करू इच्छितात.

टीव्हीवर सलमान करणार होस्ट
व्हिडिओत सलमान पुढे म्हणतो की, “टीव्हीवर मी होस्ट करेल. बूटात, सुटात, जेणेकरून त्यापूर्वी तुम्ही वूटवर पाहा.” म्हणजेच यावरून स्पष्ट होते की, सलमान खानचे ओटीटी पदार्पण म्हटले जाऊ शकत नाही. म्हणजेच सलमान खान ओटीटीवर हा शो होस्ट करताना दिसणार नाही. मात्र, हे स्पष्ट आहे की, शोची सुरुवात ओटीटीवरच होईल.

विशेष म्हणजे बिग बॉसच्या १४ व्या सिझनचा फिनाले यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडला. या सिझनची विजेती रुबीना दिलैक ठरली, तर राहुल वैद्यहा उपविजेता ठरला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

 


Leave A Reply

Your email address will not be published.