Latest Posts

आम्ही घेतली कोरोनाची लस! कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला


प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा विनोदवीर कोण? असं विचारल्यावर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव येते ते म्हणजे कपिल शर्मा होय. कपिलकडे प्रेक्षकांना खदखदून हसवण्याची कमालीची कला आहे. त्याने बोलायला सुरुवात केली की, त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव, त्याची शब्दांची निवड, हजरजबाबीपणातील त्याचे कौशल्य, त्याचे उच्चारण आणि आवाज हे सर्व असे असते, ज्यामुळे तुम्ही तुमचे हसू रोखू शकू शकत नाहीत. कपिलचा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. ३ दिवसांपूर्वी आपल्या टीममधील सर्व प्रमुख कलाकारांनी फोटो शेअर करत कमिंग सून लिहिले होते. त्यांचा हा शो लवकरच सुरू होणार आहे. 

आपल्या शोच्या येणाऱ्या सिझनच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी कपिलने आपल्या संपूर्ण स्टार कास्टचे कोरोना व्हॅक्सिनेशन केले आहे. या कोरोना व्हॅक्सिननंतर कपिलच्या संपूर्ण टीमला कोरोना व्हायरसपासून सुरक्षेचे एख कवच मिळाले आहे. (Safety First Kapil Sharma Got His Entire Team Vaccinated Before Shooting Shared Selfie)

या टिममधील कपिल शर्माव्यतिरिक्त कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, चंदन प्रभाकर, भारती सिंग आणि कीकू शारदसह शोमधील जवळपास सर्व कास्टने बुधवारी (२१ जुलै) आपले व्हॅक्सिनेशन केले आहे.

कपिलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून संपूर्ण टीमसोबतचा एक शानदार फोटो शेअर केला आहे. खरं तर हा एक सेल्फी आहे, जी कपिल शर्माने स्वत: क्लिक केली आहे.

कपिलने हा फोटो शेअर चाहत्यांना विचारले आहे की, “तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे का?”त्याच्या या प्रश्नावर चाहते जोरदार कमेंट्स करून प्रतिसाद देत आहेत.

या फोटोला कपिल आणि त्याच्या शोचे चाहते लाईक्स करत आहेत. कपिलच्या या फोटोला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

कपिल शर्मा नव्या सिझनची शूटिंग सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्याचा शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss