Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड जेव्हा सर्वांसमोर सलमान खानने केली होती अनिल कपूरच्या अंडरवेअरबाबत चर्चा; लाजेने लाल झाला होता अभिनेता

जेव्हा सर्वांसमोर सलमान खानने केली होती अनिल कपूरच्या अंडरवेअरबाबत चर्चा; लाजेने लाल झाला होता अभिनेता

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. केवळ देशातच नव्हे, तर जगभरात त्याचा प्रंचड मोठा चाहतावर्ग आहे. त्याने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याने जवळपास ३ दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यादरम्यान त्याने अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत काम करताना  कदाचित त्यांच्या अनेक वैयक्तिक गोष्टी सलमानला ठाऊक असतील. या गोष्टींबाबत तो खुलासाही करताना दिसतो. असेच त्याने दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांच्याबाबत एक खुलासा केला होता. त्यामुळे अनिल कपूर लाजेने लाल झाले होते.

सलमान खानने थेट कॅमेऱ्यासमोरच अनिल कपूर यांच्या अंडरवेअरबाबत बोलायला सुरुवात केली होती.(Superstar Salman Khan Talked About Anil Kapoor Underwear In Front of Cameras)

सलमानचा खुलासा, ‘अनिल कपूरला अंडरवेअरमध्ये चालण्याची आवड’
झाले असे की, अनिल कपूर आपल्या ‘पागलपंती’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांचा सामना सलमानसोबत झाला. सलमानने यावेळी सर्वांसमोर अनिल यांची पोल खोलत सांगितले की, “अनिल कपूरला अंडरवेअरमध्ये चालण्याची खूप आवड आहे.” सलमान खानचे हे वक्तव्य ऐकून खुद्द अनिल कपूरही हैराण झाले होते.

लाजेने लाल झाले अनिल कपूर
सलमान खानने किस्सा सांगताना म्हटले होते की, “आम्ही एका चित्रपटाची शूटिंग करत होतो आणि त्यांनी एक नवीन अंडरवेअर खरेदी केले होते. अनिल कपूरला वाटले की, ते स्वीमिंग ट्रंक आहे.” त्याचा हा खुलासा ऐकून अनिल कपूर लाजेने लाल झाले होते. ते म्हणाले होते की, “माझ्या अंडरवेअरबद्दल असे सर्वांसमोर बोलत आहात. ही चांगली गोष्ट नाहीये.”

सलमान खान आणि अनिल कपूर यांचे चित्रपट
सलमान खान आणि अनिल कपूर यांनी ‘रेस ३’, ‘बीवी नं १’, ‘नो एन्ट्री’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘युवराज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा