Thursday, September 28, 2023

‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर विवेकची सध्याची अवस्था पाहून बसेल धक्का!! तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, पाहा…

‘दया कुछ तो गडबड हैं’ हा डायलॉग ऐकला की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नावं येत, ते म्हणजे ‘सीआयडी.’ कारण यामधील सर्वच पात्रांनी स्वत:ची अशी एक वेगळीत ओळख निर्माण केली आहे. या मालिकेची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. लोक आजही ती मालिका पाहतात. सीआयडी ही मालिका टेलिव्हिजनवर जास्त काळ चालणारी पहिली मालिका आहे. ‘सीआयडी’चा पहिला एपिसोड 21 जानेवारी, 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. या शोमध्ये काम करणारा विवेक मशरू विषयी मोठी बातमी समोर आली आहे.

अभिनय सोडून या अभिनेत्याने असे काही केले आहे ज्याची चाहत्यांना अपेक्षाही नसेल. या शोमध्ये तो इन्स्पेक्टर विवेकची (Vivek Mashru) भूमिका साकारत होता. त्याचा आकर्षक लूक, त्याची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का की विवेक आता प्रोफेसर झाला आहे. विवेक आता CMR विद्यापीठ, बंगळुरू येथे प्राध्यापक आहे. विवेक प्रोफेसर झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

विवेकचा जुना फोटो शेअर करत एका ट्विटर यूजरने लिहिले की, “तुम्ही याला ओळखत असाल तर तुमचे बालपण खूप छान होते.” या ट्विटवर एका यूजरने रिप्लाय दिला आहे. त्याने लिहिले की, “सध्या विवेक त्याच्या भावाच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.” यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. या ट्विटवर विवेकने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “मी ज्या काही लहानसहान गोष्टी केल्या आहेत. त्याला तुमच्या सर्वांच्या प्रेम मिळाल त्याबद्दल धन्यवाद.”

‘सीआयडी’चा 27ऑक्टोबर, 2018ला अंतिम एपिसोड दाखवण्यात आला होता. म्हणजेच तब्बल 28 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजही लोक ‘सीआयडी’चे एपिसोड रिपीट पाहतात. यातील प्रत्येक कलाकार लोकांनाच्या आठवणीत आहेत. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. (‘CID’ fame Inspector Vivek Mashru’s photo viral)

अधिक वाचा- 
ब्रेकिंग! मराठीत सुपरहिट सिनेमे देणारा दिग्गज हरपला, कलाकारांकडून शोक व्यक्त
अभिनेत्री काजोलने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; म्हणाली, “मला भीती वाटते आणि…”

हे देखील वाचा