Thursday, May 1, 2025
Home नक्की वाचा हिरो हिरोईनचा काळ संपला! आता चित्रपटात भाव खातायेत ‘हे’ सहाय्यक कलाकार

हिरो हिरोईनचा काळ संपला! आता चित्रपटात भाव खातायेत ‘हे’ सहाय्यक कलाकार

हिंदी चित्रपट म्हणले की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त तीनच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे नायक, नायिका आणि खलनायक. संपूर्ण चित्रपट याच व्यक्तिंभोवती फिरतो आणि याच व्यक्तिरेखांना कथेत आणि चित्रपटातही जास्तीत जास्त महत्व देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. मात्र आता बदलत्या स्वरुपानुसार चित्रपटांचे स्वरुपही बदलताना दिसत आहे. मागच्या काळी वर्षांपासून हा समज आणि प्रकार मागे पडत चालला असून नायक आणि नायिकेपेक्षाही आता सहकलाकाराच्या भूमिका भाव खाताना दिसत आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यांमध्ये मूळ नायकापेक्षा सहकलाकाराचीच भूमिका सर्वात जास्त गाजलेली पाहायला मिळाली. काही कलाकारांना अशा प्रकारे सहकलाकाराची भूमिका साकारुनच प्रचंड लोकप्रियताही मिळाली आहे. कोणते आहेत ते चित्रपट आणि कलाकार चला जाणून घेऊ. 

सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi)
‘गली बॉय’ या चित्रपटात एमसी शेरची भूमिका साकारून सिद्धांत चतुर्वेदीने बॉलिवूडमध्ये मोठा ठसा उमटवला. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील एमसी शेर हा खऱ्या आयुष्यात आपल्याला हवा असलेला मित्र आहे. तो असा मित्र आहे, जो चांगले मार्गदर्शन तर करतोच, सोबतच त्यांच्या मैत्रीत कोणतीही इर्ष्या न आणता तो त्याला मदत करत असतो.

लिसा हेडन (Lisa Haydon)
‘क्वीन’ चित्रपटात, जेव्हा राणी हृदयविकारानंतर तिच्या हनीमूनला एकटी पॅरिसला पोहोचते तेव्हा विजयालक्ष्मी (लिसा हेडन) तिला बिनशर्त साथ देते. ती केवळ कंगनाची मार्गदर्शकच नाही तर तिची मैत्रीणही बनते. विजयालक्ष्मी त्रासलेल्या राणीला कशी मदत करते आणि तिच्या आत्मविश्वास आणि स्वतःवर प्रेम करण्याच्या प्रवासात तिला कशी साथ देते याचे चित्रण सुंदरपणे दाखवले आहे.

जीशान अय्यूब खान (Zeeshan Ayyub Khan)
जीशान अय्युब खानने ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’, ‘रांझना’, ‘नो वन किल्ड जेसिका’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. झीशानने हे सर्व चित्रपट आपल्या अभिनयाने उत्कृष्ट बनवले आहेत. त्याच्या भूमिका नसत्यातर कदाचित हे चित्रपट अपूर्ण वाटले असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘रांझना’मध्ये धनुषचा मित्र, तर ‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’मध्ये कंगनाच्या घरी भाड्याने राहणारा तरुण अशा भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. झीशानने सर्वच व्यक्तिरेखा प्रचंड सुंदरपणे रेखाटल्या आहेत.

दीपक डोबरियाल  (Deepak Dobriyal)
‘दिल्ली 6’, ‘ओमकार’, ‘दबंग’, ‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटात दीपकने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. या त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ‘यू आर ए गुड क्वेश्चन, बट योर क्वेश्चन हर्ट मी’ हा त्याचा डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

विकी कौशल (Viki Kaushal)
साल २०१८ मध्ये आलेल्या ‘संजू’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलने कमली नावाची भूमिका साकारली होती. संजय दत्तच्या आयुष्यावर असलेल्या या चित्रपटात कमली म्हणजे त्याच्या मित्राच्या भूमिकेतील विकीच्या अभिनयाला प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतले. चित्रपटातील मुख्य अभिनेता असलेल्या रणबीर कपूरपेक्षाही ही भूमिका भाव खाऊन गेली होती.

राजकुमार राव (Rajkumar Rao)
बरेली की बर्फी राजकुमार रावने प्रितम विद्रोहीची भूमिका साकारली होती. आपल्या मित्राला तो प्रत्येक संकटात मदत करताना या चित्रपटात दिसला होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा