बाबो! श्रीदेवीच्या मुलीचा ‘रूही’ चित्रपटातील लूक तर पाहा, दिवसाढवळ्याही वाटेल भीती

Seeing The Scary Look of Janhvi Kapoor In Roohi People Will Start Getting Scared Even During The Day See Photos


कलाकार होणं सोप्पं नसतं. कारण कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात. कधी ते डॅशिंग नायकाची भूमिका साकारतात, तर कधी खलनायक बनतात. आता बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरही अशाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेे. जान्हवीकडे पाहिलं तर कोणालाच वाटणार नाही की, ही अभिनेत्री एखाद्याला भीतीही दाखवू शकेल. परंतु हे खरं ठरणार आहे. कारण तिने आपल्या नवीन चित्रपटातील आपला भीतीदायक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘रूही’ या भयपटातील आपला भयानक लूक शेअर केला आहे. या चित्रपटात तिने एका अशा मुलीची भूमिका साकारली आहे, जिच्यावर आत्म्याचा प्रभाव आहे. अशामध्ये या चेहऱ्यासोबत ती दिवसाढवळ्या कोणालाही भीती दाखवू शकते.

जान्हवीचे हे भयावह फोटो पाहिल्यानंतर तिच्या या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

जान्हवीचे हे फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, तिने ही भूमिका भीतीदायक बनवण्यासाठी कोणकोणते प्रयोग केले आहेत.

जान्हवीला हा लूक देण्यासाठी प्रोस्थेटिक्सचा (कृत्रिम शरीराचे अवयव) आधार घेण्यात आला आहे. चित्रपटात नैसर्गिक शक्ती दाखवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर केला आहे.

रूही चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, अंतिम लूक निश्चित करण्यापूर्वी जान्हवीला १० लूक चाचणी द्यावी लागली होती. नक्कीच सेटवर प्रोस्थेटिक लावून आपल्या सीनची तासंतास वाट पाहणे सोप्पं काम नाहीये.

जान्हवी प्रोस्थेटिक लावल्यानंतर ज्याप्रकारे आपली भूमिका साकारते, ते पाहून दिग्दर्शकही पुरते हैराण झाले होते. तिचे हावभाव आणि आवाज दोन्हीही या भूमिकेसाठी अनुकूल ठरले.

सोमवारी या चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यामध्ये जान्हवीने असिस्टंटच्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. रूही चित्रपटात राजकुमार रावही दिसणार आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी आजकाल तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील जान्हवीचा लूक समोर आला होता. यात ती पंजाबी लूकमध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ सेन आहेत. पंकज मत्ता यांनी त्याची कथा लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली असून यात दीपक डोबरियाल, सुशांत सिंग आणि जान्हवी कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

याशिवाय जान्हवी ‘दोस्ताना 2’ चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पटौदी घराण्याचा छोटा नवाब पुन्हा एकदा चर्चेत, गोंडस फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.