Monday, March 4, 2024

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी केली जागा खरेदी, जाणून घ्या अयोध्येतील जागेचे भाव

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांनी एक खास गोष्ट केली आहे. अयोध्येत घर बांधण्यासाठी त्यांनी 14.5 कोटी रुपयांचा जागा खरेदी केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी हि जागा मुंबईस्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याकडून 7 स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये विकत घेतला आहे. अभिनंदन लोढा यांच्या घराने अद्याप घराच्या आकाराबाबत भाष्य केलेले नाही परंतु अहवालानुसार ते १०,००० चौरस फुटांचे घर बांधणार आहे.

‘द सरयू’ देखील 22 जानेवारीला लॉन्च होणार आहे. ज्या दिवशी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी या मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्याशी या प्रकल्पाविषयी चर्चा केली. अमिताभ बच्चन म्हणाले की, “अयोध्येतील सरयूसाठी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा सोबत हा प्रवास सुरू करताना मी खूप उत्साहित आहे. माझ्या हृदयात विशेष स्थान असलेले हे शहर आहे. अयोध्येतील शाश्वत अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमांच्या पलीकडे भावनिक संबंध निर्माण केला आहे. अयोध्येच्या आत्म्याच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. मी जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बनवण्यास उत्सुक आहे.”

अमिताभ बच्चन यांचा जन्म प्रयागराज येथे झाला होता. प्रयागराज ते अयोध्या हा प्रवास ४ तासांचा आहे. आता त्यांनी अयोध्येत ही जागा घेतलेली आहे. जे राम मंदिरापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. अयोध्या विमानतळ सरयूपासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन शेवटचे टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननसोबत ‘गणपत’ या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. ते प्रभाससोबत कल्की 2898 मध्ये दिसणार आहे. याशिवाय ते रजनीकांतसोबत चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत काही काळापूर्वी घोषणा करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता! आगामी नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीझ
‘ऍनिमल माझ्या टाइपची फिल्म नाही’,कोंकणा सेन शर्माचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत

हे देखील वाचा